स्वॅब नमुने तपासणी प्रक्रिया जाणार लांबणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2020 05:00 AM2020-05-31T05:00:00+5:302020-05-31T05:01:04+5:30

गोंदिया येथे शासकीय महाविद्यालय असून येथे कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने स्वॅब नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळा आणि आवश्यक यंत्रसामुग्री नव्हती. त्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील स्वॅब नमुने नागपूर येथील मेयो आणि मेडिकलच्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले जात होते.

The inspection process of swab samples will be delayed | स्वॅब नमुने तपासणी प्रक्रिया जाणार लांबणीवर

स्वॅब नमुने तपासणी प्रक्रिया जाणार लांबणीवर

googlenewsNext
ठळक मुद्देमशिनचे काच फुटल्याने समस्या । हैद्राबादवरुन मागविले काच

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने स्वॅब नमुने तपासणी प्रयोगशाळा तयार करण्यात आली. यासाठी सिंगापूरहून मशिन देखील मागविण्यात आली. या मशिनचे तज्ज्ञांकडून शुक्रवारी इन्स्ट्रालेशन सुध्दा झाले. मात्र स्वॅब नमुने तपासणी करण्याच्या मशिनचे काच फुटले असल्याने आता गोंदिया येथे स्वॅब नमुने तपासणीची प्रक्रिया पुन्हा चार ते पाच दिवस लांबणीवर गेली आहे.
गोंदिया येथे शासकीय महाविद्यालय असून येथे कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने स्वॅब नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळा आणि आवश्यक यंत्रसामुग्री नव्हती. त्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील स्वॅब नमुने नागपूर येथील मेयो आणि मेडिकलच्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले जात होते. तर नागपूर येथील दोन्ही प्रयोगशाळेत संपूर्ण विदर्भातील स्वॅब नमुने तपासणीसाठी येत असल्याने त्याचा अहवाल प्राप्त होण्यास विलंब होत होता. परिणामी रुग्णांवर त्वरीत उपचार सुरू करण्यास अडचण होत होती. ही बाब लक्षात घेत शासनाने गोंदिया येथे कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने स्वॅब नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळा सुरू करण्यास मंजुरी दिली. यासाठी सिंगापूर येथून मशिन देखील मागविण्यात आली. ही मशिन दहा दिवसांपूर्वी गोंदिया येथे दाखल झाली. यानंतर शुक्रवारी (दि.२९) या मशिनचे इन्स्ट्रॉलेशन करण्यासाठी ही मशिन उघडण्यात आली. मात्र ज्या मशिनवर स्वॅब नमुने तपासणी केले जातात त्याच मशिनचे काच फुटलेले आढळले. वाहतुकी दरम्यान या मशिनचे काच फुटले असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. यवतमाळ येथील देखील याच मशिनचे काच फुटलेले आढळले. त्यामुळे इन्स्ट्रॉलेशन करण्यासाठी आलेल्या तज्ज्ञांनी इतर मशिनचे काम पूर्ण केले. केवळ नमुने तपासणीची मशिन काच फुटले असल्याने सुरू झाली नाही. त्यानंतर हैद्राबाद येथून या मशिनचे काच मागविण्यात आले आहे. मात्र ते काच येण्यासाठी किमान चार ते पाच दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. काच आल्यानंतर लगेच कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने स्वॅब नमुने तपासणीची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. त्यामुळे सोमवारपासून (दि.१) सुरू होणारी स्वॅब नमुने तपासणीची प्रक्रिया आता लांबणीवर गेली आहे.

पुन्हा आठवडाभर नागपूरच्या भरोश्यावर
येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने स्वॅब नमुने तपासणी प्रयोगशाळा सज्ज झाली आहे. यासाठी आवश्यक यंत्र सामुग्री देखील दाखल झाली आहे. मात्र स्वॅब नमुने तपासणी करणाऱ्या मशिनचे काच फुटले असल्याने नमुने तपासणीची प्रक्रिया सुरू करता येणार नाही. त्यामुळे पुन्हा आठवडाभर स्वॅब नमुने तपासणीसाठी नागपूर येथील प्रयोगशाळेवर अवलंबून राहावे लागणार आहे.

Web Title: The inspection process of swab samples will be delayed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.