अवैध दारूविक्रीला पोलिसांनी घातला आळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2017 00:19 IST2017-03-16T00:19:28+5:302017-03-16T00:19:28+5:30
जिल्हा पोलिसांनी होळी व धुळवडीला मोठ्या प्रमाणात दारु जप्त करून दारु विक्रेत्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले.

अवैध दारूविक्रीला पोलिसांनी घातला आळा
ठिकठिकाणी कारवाई : होळीच्या पार्श्वभूमीवर विक्रेत्यांना पकडले
गोंदिया : जिल्हा पोलिसांनी होळी व धुळवडीला मोठ्या प्रमाणात दारु जप्त करून दारु विक्रेत्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. गोंदिया ग्रामीण पोलिसांनी चांदणीटोला येथील शोभा पतीराम नागपुरे (४०) हिच्याकडून सहा नग देशी दारुचे पव्वे, आसोली येथील सुदेश ग्यानीराम गडपायले (४०) याच्याकडून तीन लिटर मोहफुलाची दारु, रामनगर पोलिसांनी सुभाष वार्ड कुडवा येथील गजेंद्र मेश्राम (४६) याच्याकडून तीन लिटर हातभट्टीची दारु, अंगूर बगीचा येथील हरिराम गोपीचंद बुडेकर (५२) याच्याकडून ९६ देशी दारुचे पव्वे व एक मोटरसायकल असा एकूण १४ हजार ८०० रुपयाचा माल जप्त केला.
मरारटोली येथील विजय पुणाराम खोब्रागडे (४४) याच्याकडून पाच नग देशी दारुचे पव्वे, कुडवा येथील संगीता इश्वर वंजारी हिच्याकडून १० लिटर हातभट्टीची दारु, संजय यादोराव चव्हाण याच्याकडून १० लिटर हातभट्टीची दारु, आमगाव पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या कालीमाटी येथील सुनिल पाथोडे याच्याकडून १०१ देशी दारुचे पव्वे केले.
शहर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या नंगपुरा मुर्री येथील अनिल शंकर टेकाम (२५) याच्याकडून ४८ देशी दारुचे पव्वे, केशोरी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या प्रतापगड येथील हेमराज सलामे (२८) याच्याकडून ५० नग देशी दारुचे पव्वे, बागडबंद येथील तामन परतेकी याच्याकडून सात लिटर हातभट्टीची दारु, सुखचंद वाढवे (५०) याच्याकडून पाच लिटर हातभट्टीची दारु, ग्रामीण पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या पांढराबोडी येथील भाऊलाल डहारे (६५) याच्याकडून चार नग देशी दारुचे पव्वे, रतनारा येथील छत्रपती कोटू बैठवार (४५) याच्याकडून १७ नग देशी दारुचे पव्वे, कैलाश बिजेवार (४५) याच्याकडून १० नग देशी दारुचे पव्वे, लोहारा येथील दिलीप डोंगरे (५०) याच्याकडून १८ नग देशी दारुचे पव्वे, डुग्गीपार पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या जांभळी येथील श्रीनिवास परकलवार (३३) याच्याकडून ८८ नग देशी दारुचे पव्वे, पाटेकुर्रा येथील देवेंद्र बालसवार याच्याकडून १४ नग देशी दारुचे पव्वे, गंगाझरी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या धुमनटोला येथील ओंकार उईके (२५) याच्याकडून १० लिटर हातभट्टीची दारु, बंगलाटोली येथील मिरा पगरवार (६०) या महिलेकडून १० लिटर हातभट्टीची दारु, गोंदिया ग्रामीण पोलिसांनी इर्री येथील मुकेश छनकलाल ठकरेले (२५) याच्याकडून १० नग देशी दारुचे पव्वे, गंगाझरी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या दांडेगाव येथील ज्ञानीराम चौरे (६५) याच्याकडून १० लिटर हातभट्टीची दारु, ओझीटोला येथील मधु शंकर चनाप (३०) याच्याकडून एक देशी दारुचा पव्वा जप्त केला.
दवनीवाडा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या तिलकराम नत्थु भुजाडे याच्याकडून २२ नग देशी दारुचे पव्वे तर खातीटोला येथील छोटेलाल उमा घाटकर (५७) याच्याकडून १८ नग देशी दारुचे पव्वे जप्त करण्यात आले.परसवाडा येथील नरेश हरिदास टेंभुर्णीकर (५०) याच्याकडून ८ लिटर मोहफुलाची दारु, बलमाटोला येथील मनीष उर्फ जयराम धर्मराज सेवईवार याच्याकडून ९० देशी दारुचे पव्वे, ३ विदेशी दारुचे पव्वे जप्त करण्यात आले. सोनबिहरी येथील कुवर चैतराम उके (४५) याच्याकडून १८ नग देशी दारुचे पव्वे, महालगाव येथील गणेशप्रसाद यशवंत नागपुरे (२५) याच्याकडून १० लिटर हातभट्टीची दारु जप्त करण्यात आली.
चिचगड पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या नकटी येथील जनार्दन काशीराम मेश्राम (३५) याच्याकडून ३५ नग देशी दारुचे पव्वे, गंगाझरी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या दांडेगाव येथील गोविंद नागोराव लिचडे (३२) याच्याकडून १० लिटर हातभट्टीची दारु, मंगेझरी येथील तेजराम नारायण कुंभरे (६५) याच्याकडून १० लिटर हातभट्टीची दारु, ग्रामीण पोलीस ठाण्यांतर्गत इर्री येथील जितेंद्र रामचंद भालाधरे (२९) याच्याकडून १५ लिटर, तांडा येथील संतोष भरत पटेरिया (४०) याच्याकडून २४ नग देशी दारुचे पव्वे जप्त करण्यात आले. कोहमारा येथील शारदा शंकर राऊत (५१) या महिलेकडून ५३ नग देशी दारुचे पव्वे जप्त करण्यात आले.सदर आरोपीविरुध्द मुंबई दारुबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (तालुका प्रतिनिधी)
विशेष पथकाने पकडली १२ पेट्या दारु
पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाच्या १२ पेटी दारु जप्त केली. या प्रकरणात चार आरोपींना अटक केली. डुग्गीपार पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या जांभळी येथील श्रीनिवास बागीया परकलवार (३३) याच्याकडून १८० मिलीचे ११ पव्वे, ९० मिलीचे ८८ पव्वे, पाटेकुर्रा येथील देवेंद्र मल्लेश बालसनवार (२७) याच्याकडून दोन पेटी दारु व एका प्लास्टीक पिशवीतील १४ नग देशी दारुचे पव्वे, चिचगड पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या गणूटोला येथील परिसरात सोनू हिरामन शहारे (२४) रा. चिचगड व खुशाल कुंगु हलानी (२०) रा. गणूटोला याच्याकडून ८ पेट्या दारु जप्त करण्यात आली. सदर कारवाई सहायक पोलीस निरीक्षक किशोर पर्वते, चंद्रकांत करपे, शामकुमार डोंगरे, धनेश्वर पिपरेवार, दुर्योधन हनवंते, राकेश डोंगरवार, लखनलाल काटेंगा व डिलन कोहरे यांनी केली आहे.