उपकेंद्रात कोरोना लसीकरणाला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:29 IST2021-03-31T04:29:17+5:302021-03-31T04:29:17+5:30
उपकेंद्रात आयोजीत लसीकरणप्रसंगी सरपंच प्रतिमा बोरकर, उपसरपंच भाग्यवान फुल्लुके, माजी जि. प. सदस्य कमल पाऊलझगडे, माजी पं. स. सदस्य ...

उपकेंद्रात कोरोना लसीकरणाला सुरुवात
उपकेंद्रात आयोजीत लसीकरणप्रसंगी सरपंच प्रतिमा बोरकर, उपसरपंच भाग्यवान फुल्लुके, माजी जि. प. सदस्य कमल पाऊलझगडे, माजी पं. स. सदस्य पिंगला ब्राम्हणकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. श्वेता कुळकर्णी, डॉ. कुंदन कुलसुंगे, आरती काळे प्रामुख्याने उपस्थित होते. राज्यात सर्वत्र कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत असून, गावातही शिरकाव होत आहे. अशात प्रत्येकाने सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाने लसीकरण करण्यावर सर्वाधिक भर दिला आहे. यासाठीच गावपातळीवरील उपकेंद्रात कोरोना लसीकरणाला सुरूवात करण्यात आली. यावेळी डॉ. कुलसुंगे यांनी, ६० वर्षांवरील तसेच ४५ ते ५९ वर्षांतील लोकांना लसीकरण करण्याचे लक्ष असल्याचे सांगितले. लसीकरणामुळे कुठलाही दुष्परिणाम होत नाही. स्वयंस्फूर्तीने पुढे येऊन लसीकरण करून घ्यावे, असे आरोग्य विभागाच्या वतीने आवाहन करण्यात आले. पहिल्याच दिवशी गावातील १२० लोकांना कोरोनाची प्रतिबंधात्मक लस देण्यात आली. यानंतर ४ ते ८ आठवड्यांनी दुसरा डोज दिला जाणार आहे. प्रास्ताविक डॉ. श्वेता कुळकर्णी यांनी मांडले. संचालन करून आभार डॉ. कुलसुंगे यांनी मानले. लसीकरणासाठी प्रतिभा राऊत, पवन साखरे, रविना कोडापे, अनंता सातारे, स्वाती लोहारे, विजय शेंडे, मंदा नंदेश्वर, वर्षा रामटेके, सारिका रंगारी, रेखा सिखरामे यांनी सहकार्य केले.