ग्रामसभेत योजनांची माहिती
By Admin | Updated: April 25, 2016 01:44 IST2016-04-25T01:44:46+5:302016-04-25T01:44:46+5:30
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्ताने ग्राम उदय ते भारत उदय अभियानांतर्गत शनिवारी २३ एप्रिलला ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसभा पार पडली.

ग्रामसभेत योजनांची माहिती
इसापूर : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्ताने ग्राम उदय ते भारत उदय अभियानांतर्गत शनिवारी २३ एप्रिलला ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसभा पार पडली. या निमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले.
या अभियानांतर्गत पंचायतराज संस्थांचे बळकटीकरण, शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी विविध शासकीय योजना, राष्ट्रीय पंचायत दिनाचे महत्त्व आणि ७३ वी घटना दुरूस्तीने झालेले बदल, ग्रामपंचायत विकास आराखडा, निधीचा उत्तम विनियोग, स्वच्छ पाणी व स्वच्छता, ग्रामविकासात महिलांचा सहभाग, शासनाच्या विविध योजना व त्यांचा वापर कसा करावा तसेच रोजगार हमी अधिनियम, आपले गाव स्वच्छ व हागणदारी मुक्त गाव, गावविकासात महिलांचे योगदान, गावातील बचतगटांनी केलेली कामे, सामाजिक एकता व जातीय सलोखा राखण्यासाठी प्रत्येकाने घ्यावयाची काळजी, वंचित घटकाला शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी घ्यावयाची काळजी, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, दिनदयाल अंत्योदय योजना, ग्रामीण कौशल्य योजना, प्रधानमंत्री आवास योजना, बेटी बचाओ, बेटी पढाओ योजना तसेच विविध योजनांची ग्रामसभेत माहिती देण्यात आली.
अध्यक्षस्थानी ग्रा.पं. सदस्य दामोधर चांदेवार होते. याप्रसंगी सुनिता गेडाम, डिगेश्वरी चांदेवार, आशा वर्कर तनुजा अनवले, डी.एस. मेश्राम, रिमा येरणे, संतोष रोकडे, विजय मेश्राम व ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)