माहिती अधिकाराची केली पायमल्ली

By Admin | Updated: November 11, 2016 01:37 IST2016-11-11T01:37:44+5:302016-11-11T01:37:44+5:30

येथील सेवा सहकारी संस्थेच्या (र.नं. ५४९) कार्यप्रणालीत घोळ असून सभासदांची गुंतवणूक किती टक्के जमा झाली,

Information about the right to information | माहिती अधिकाराची केली पायमल्ली

माहिती अधिकाराची केली पायमल्ली

परसवाडा : येथील सेवा सहकारी संस्थेच्या (र.नं. ५४९) कार्यप्रणालीत घोळ असून सभासदांची गुंतवणूक किती टक्के जमा झाली, त्यावरील व्याज शेतकऱ्यांना देण्यात आले का व शेतकऱ्यांकडून शेअर रोखे जमा किती, याबाबत माहितीचा अधिकार २४ जून २०१५ ला सेवा सहकारी संस्थेचे सचिव झनकलाल हरिणखेडे यांना शेतकरी रमेश पटले बघोली यांनी लावला. पण माहिती अधिकाराची पायमल्लीच करण्यात आली.
हरिणखेडे यांनी पाच महिने लोटूनही शेतकऱ्याला माहिती दिली नाही. सादे पत्रसुद्धा दिले नाही. उलट शेतकऱ्याची समजूत घालण्यासाठी दबावतंत्राचा वापर करून माहिती देता येत नसल्याचे सांगण्यात येत आहे.
अपिलीय अधिकारी सहायक निबंधक तिरोडा यांना ६ आॅगस्ट २०१६ ला अपिलल करण्यात आले. पण त्यांनीही माहिती देण्यास टाळाटाळ केली. तोंडी-लेखी सादर करण्यास शेतकऱ्यास २२ आॅगस्टला बोलावले होते. पण स्वत:च अपिलीय अधिकारी गैरहजर होते. त्यांनी नंतर पत्र दिलेच नाही. शेतकऱ्यांचे लाखो रुपये कर्जातमध्ये आहेत. कर्ज घेतेवेळी शेतकऱ्यांकडून ५ टक्के रक्कम कापली जाते व त्या रकमेवर शेतकऱ्यांकडून व्याजही वसूल केला जातो. शेतकऱ्याला शेयरच्या रकमेवर व्याज दिले जात नाही व त्यांना डीव्हीडंटही दिले जात नाही. तसेच कर्जात जमा केले जात नाही. व्याजवरील रक्कम संचालक सचिव आपल्या घस्यात टाकून असून शेतकऱ्यांची मोठी पिळवणूक होत असल्याचे रमेश पटले यांनी सांगितले. एकीकडे सहकार विभाग स्वच्छ प्रतिमेचा उदोउदो करतो तर दुसरीकडे माहिती देण्यास टाळाटाळ केले जात आहे. (वार्ताहर)

Web Title: Information about the right to information