घरोघरी पोहोचावी योजनांची माहिती
By Admin | Updated: June 18, 2017 00:25 IST2017-06-18T00:25:10+5:302017-06-18T00:25:10+5:30
शासनाने केलेल्या कामांची माहिती प्रत्येकाला होणे गरजेचे आहे. यासाठी घरोघरी शासनाच्या योजनांची माहिती पोहोचावी.

घरोघरी पोहोचावी योजनांची माहिती
उपेंद्र कोठेकर : कार्य विस्तार योजनेची आढावा बैठक
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शासनाने केलेल्या कामांची माहिती प्रत्येकाला होणे गरजेचे आहे. यासाठी घरोघरी शासनाच्या योजनांची माहिती पोहोचावी. तसेच पक्षाच्या विस्तारासाठी बूथ समिती गठीत करून त्यांची यादी तयार करण्याचे आवाहन भारतीय जनता पक्षाचे विदर्भ संघटन मंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर यांनी केले.
पंडीत दीनदयाल उपाध्याय कार्य विस्तार योजनेंतर्गत गोंदिया शहर व ग्रामीण मंडळाच्या पदाधिकारी व विस्तारकांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीला जिल्हा विस्तर योजना प्रभारी श्रीकांत देशपांडे, जिल्हाध्यक्ष हेमंत पटले, माजी जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल, डॉ.खुशाल बोपचे, संघटन मंत्री बाळा अंजनकर, नेतराम कटरे, नगराध्यक्ष अशोक इंगळे, भाऊराव उके, नगर परिषद उपाध्यक्ष शिव शर्मा, शहर अध्यक्ष सुनिल केलनका, ग्रामीण मंडळ अध्यक्ष छत्रपाल तूरकर, कशिश जायस्वाल, दिनेश दादरीवाल, रजनी नागपूरे, संतोष चव्हाण, भरत क्षत्रिय, भावना कदम, रवीकांत बोपचे, नंदू बिसेन प्रामुख्याने उपस्थित होते.
याप्रसंगी शहर अध्यक्ष केलनका व ग्रामीण मंडळ अध्यक्ष तूरकर यांनी शहरात १२० व ग्रामीण मंडळात २१५ बूथवर केल्या जात असलेल्या कामांची माहिती दिली. तर सहयोग निधी प्रमुख क्षत्रिय व सह प्रमुख दादरीवाल यांनी आजीवन सहयोग निधी संकलनाची माहिती दिली. जिल्हाध्यक्ष पटेल यांनी, पंडीत उपाध्याय यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. तर माजी जिल्हाध्यक्ष अग्रवाल यांनी, कार्य विस्तार योजनेच्या कामाला गती देण्याचे मत व्यक्त केले.
बैठकीला जिल्हा परिषद सभापती छाया दसरे, जि.प.सदस्य श्यामकला पाचे, शैलजा सोनवाने, कमलेश्वरी लिल्हारे, नगरसेवक बंटी पंचबुद्धे, बेबी अग्रवाल, मौसमी परिहार, सभापती घनश्याम पानतवने, हेमलता पतेह, दीपक बोबडे, दिलीप गोपलानी, ऋषीकांत साहू, विवेक मिश्रा, मुजीब पठाण, विमला मानकर, सतीश मेश्राम, बाबा बिसेन, जयंत शुक्ला, कुशल अग्रवाल, पंकज सोनवाने, अहमद मनिहार, संजय मुरकुटे यांच्यासह शहर व ग्रामीण मधील पदाधिकारी, विस्तारक उपस्थित होते.