शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
2
एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून...
3
'एका व्यक्तीच्या मूर्खपणामुळे देशाचे नुकसान..; केंद्रीय मंत्री किरेन रिजिजूंचा काँग्रेसवर घणाघात
4
मुंबई: दहीहंडीचा सराव करताना दहिसरमध्ये चिमुरड्या बालगोविंदाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा
5
बँका मिनिमम बॅलन्स का ठेवतात? 'या' कारणामुळे तुमच्या खात्यातून कापले जातात पैसे!
6
'भारतात शिक्षण, आरोग्य सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलंय'; सरसंघचालक भागवतांनी व्यक्त केली चिंता
7
एअर इंडियामागची पीडा काही संपेना! आता लँडिंगनंतर दरवाजेच उघडले नाही; तासभर अडकून राहिले प्रवासी
8
भाजपाकडून विधानसभा निवडणूक लढवलेला नेता चकमकीत ठार, अनेक गुन्ह्यांत होता वाँटेड
9
देवदर्शनासाठी जाणारी पिकअप १०० ते १५० फूट दरीत; ३० महिला जखमी, तिघांचा मृत्यू, खेड तालुक्यातील घटना
10
बाजारात तेजी परतली! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, टाटा-SBI सह 'या' शेअर्सचा गुंतवणूकदारांना दिलासा
11
शाब्बास पोरी! देशसेवेचं स्वप्न पाहिलं- सत्यात उतरवलं अन् झाली IAS; हार मानलीच नाही..
12
डोनाल्ड ट्रम्प झाले 'वसुली भाई'; चिप निर्यातीचा लायसन्स देण्यासाठी आता कंपन्यांकडून मागताहेत पैसे
13
Janmashtami 2025: १० ऑगस्ट रोजी सुरू झाली आहे कृष्ण नवरात्र; त्याची सांगता कधी आणि कशी?
14
MS Dhoni: "तुला आयपीएल खेळायचं आहे", चाहत्याची कमेंट, धोनीनं काय उत्तर दिलं? पाहा
15
भटक्या कुत्र्यांना पकडा आणि..., सर्वोच्च न्यायालयाने दिले सक्त आदेश
16
“भाजपा-महायुती लुटेरे, केंद्रात-राज्यात राज्यघटनेच्या विचाराचे सरकार आणू”; काँग्रेसचा एल्गार
17
Janmashtami 2025: पती-पत्नीचे नाते राधा-कृष्णासारखे व्हावे, म्हणून जन्माष्टमीला करा 'हे' वास्तू उपाय!
18
१५० सेवा, ३ कोटी प्रवासी, ७५ हजार कोटींचे उत्पन्न; ‘वंदे भारत’ची महाराष्ट्रात काय स्थिती?
19
मध्य प्रदेशात भीषण अपघात, जीप आणि दुचाकीच्या धडकेत 5 जणांचा जागीच मृत्यू; नेमकं काय घडलं?
20
हत्तीजवळ जाऊन फोटो काढणे भोवले; तरुणाला पायाखाली चिरडले, पाहा धक्कादायक Video...

विदेशातून परतणाऱ्यांमुळे वाढतोय गोंदिया जिल्ह्यात संसर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2020 20:48 IST

बुधवारी (दि.८) विदेशातून परतलेल्या चार जणांचे स्वॅब नमुने कोरोना पॉझिटिव्ह तर तीन स्थानिक नागरिक कोरोना बाधित आढळले. विदेशातून परतणाऱ्यांमुळे गोंदिया जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देआणखी सात कोरोना बाधितांची भरआठ कोरोना बाधित कोरोनामुक्तकोरोना अ‍ॅक्टीव्ह रुग्णांचा आकडा ६४ वर

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात कोरोना संक्रमणाची स्थिती आटोक्यात येत असल्याचे चित्र असताना विदेशातून स्वगृही परतणाºया नागरिकांमुळे कोरोनाचे संक्रमण पुन्हा वाढत असल्याचे चित्र आहे. मागील आठ दिवसात विदेशातून स्वगृही परतलेल्या २५ हून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर बुधवारी (दि.८) विदेशातून परतलेल्या चार जणांचे स्वॅब नमुने कोरोना पॉझिटिव्ह तर तीन स्थानिक नागरिक कोरोना बाधित आढळले. विदेशातून परतणाऱ्यांमुळे जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे चित्र आहे.

तिरोडा तालुक्यातील पाचशेहून अधिक नागरिक रोजगारासाठी आखाती देशात गेले आहेत. मात्र कोरोनाचा संसगार्मुळे सर्वत्र लॉकडाऊन आणि संचारबदी आहे. त्यामुळे ते आपल्या स्वगृही परतत आहे. आतापर्यंत जिल्ह्यात तीनशेहून अधिक नागरिक विदेशातून परतले आहेत. यापैकी ७० ते ८० जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सोमवारी आणि मंगळवारी जिल्ह्यात एकूण आढळलेल्या कोरोना बाधितांमध्ये सर्वाधिक रुग्ण हे विदेशातून परतलेलेच आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोना आॅटोक्यात येत असल्याचे चित्र असताना विदेशातून येणाºया नागरिकांमुळे कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. विशेष म्हणजे २५ जूनपूर्वी जिल्ह्यात स्थानिक कोरोना बाधित रुग्णांचे प्रमाण हे बोटावर मोजण्या इतके होते. मात्र गोंदिया तालुक्यातील मुंडीपार येथील एका कंपनीत कार्यरत एका वृध्दाचा नागपूर येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला होता. त्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचे स्वॅब नमुने घेतले असता ते कोरोना पॉझिटिव्ह आले. त्यामुळे जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येत पुन्हा वाढ झाली. बुधवारी आणखी तिरोडा तालुक्यातील चार जणांचे आणि सडक अजुर्नी तालुक्यातील ३ अशा एकूण सात जणांचे स्वॅब नमुने कोरोना पॉझिटिव्ह आले. या सर्वांना गोंदिया जिल्हा क्रीडा संकुलातील कोविड केअर सेंटरमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले. तर आठ कोरोना बाधित कोरोनामुक्त झाल्याने त्यांना कोविड केअर सेंटरमधून सुटी देण्यात आली. ही जिल्हावासीयांसाठी थोडी दिलासा दायक बाब आहे.

जिल्ह्यातील एकूण  कोरोना रुग्णांची संख्या ६४ वर पोहचली आहे. तर आतापर्यंत एकूण १९२ कोरोना बाधितांची नोंद झाली असून यापैकी १२६ कोरोना बाधित कोरोनामुक्त होवून आपल्या घरी परतले आहेत. दोन कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण चांगले असल्याने जिल्हावासीयांना थोडा दिलासा मिळाला आहे.२६२ स्वॅब नमुन्यांच्या अहवालाची प्रतीक्षाकोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत एकूण ४८६७ स्वॅब नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. यापैकी १९२ नमुन्यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. तर ४६७५ नमुन्यांचा अहवाल कोरोना निगेटिव्ह आला. २६२ स्वॅब नमुन्यांचा अहवाल गोंदिया येथील प्रयोगशाळेकडून जिल्हा आरोग्य विभाग आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला प्राप्त व्हायचा आहे.महिनाभरात ३४९४ नमुन्यांची तपासणीयेथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने स्वॅब नमुने तपासणीसाठी ८ जूनपासून प्रयोगशाळा सुरू करण्यात आली. या प्रयोगशाळेत महिनाभराच्या कालावधीत एकूण ३४९४ स्वॅब नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे येथील प्रयोगशाळेत सुरूवातीला १२० स्वॅब नमुने दररोज तपासणीची परवानगी दिली होती. त्यात आता वाढ करण्यात आली असून दररोज १५० स्वॅब नमुने तपासणी केले जात आहे.जिल्ह्यात आता १६ कंटेन्मेंट झोनजिल्ह्यात मागील आठ दहा दिवसांपासून कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून स्थानिक प्रशासनाने हा परिसर कंटेन्मेंट झोन घोषीत केला आहे. त्यानुसार सध्या जिल्ह्यात एकूण १६ कंटेन्मेंट झोन आहेत. गोंदिया तालुक्यातील मुंडीपार, फतेपूर, डोंगरगाव, सेजगाव,पारडीबांध, कुंभारेनगर व सालेकसा तालुक्यातील पाऊलदौना, पाथरी, शारदानगर, तिरोडा तालुक्यातील सुभाष वॉर्ड, बेरडीपार बेलाटी, वीर सावरकर वार्ड,  खोडशिवणी, सौंदड आदी गावांचा समावेश आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस