स्वतंत्र फिडरमुळे अडचणी सुटणार
By Admin | Updated: March 13, 2016 02:08 IST2016-03-13T02:08:40+5:302016-03-13T02:08:40+5:30
मागेल त्याल वीज कनेक्शन देण्यात येत आहे. त्यामुळे राज्याचे चित्र बदलत असून राज्याची वीज भारनियमन मुक्तीकडे वाटचाल सुरु आहे.

स्वतंत्र फिडरमुळे अडचणी सुटणार
पालकमंत्री बडोले : ३३ के.व्ही.च्या कोहमारा उपकेंद्राचे उद्घाटन
गोंदिया : मागेल त्याल वीज कनेक्शन देण्यात येत आहे. त्यामुळे राज्याचे चित्र बदलत असून राज्याची वीज भारनियमन मुक्तीकडे वाटचाल सुरु आहे. कृषी पंप जोडणीमुळे शेतकरी आता बारमाही शेतीकडे वळत आहे. वीज वितरण कंपनीने शेतकऱ्यांच्या वीजेबाबतच्या अडचणी सोडविण्यासाठी आता फिडर सेपरेशनचा कार्यक्रम प्रभावीपणे राबवावा, असे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
सडक/अर्जुनी तालुक्यातील कोहमारा (कोसबी) येथे राज्य वीज वितरण कंपनीच्या ३३/११ के.व्ही उपकेंद्राच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पंचायत समितीच्या सभापती कविता रंगारी होत्या. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद सदस्य माधुरी पाथोडे, महावितरणच्या गोंदिया परिमंडळाचे मुख्य अभियंता बी.के.जनवीर, अधीक्षक अभियंता कबीरदास चव्हाण, ए.एस.घोगरे, भंडाराचे अधीक्षक अभियंता मडावी, गोंदियाचे कार्यकारी अभियंता सावळे, देवरीचे कार्यकारी अभियंता वाकडे, सडक/अर्जुनीचे उपविभागीय अभियंता दखने, विद्युत निरीक्षक विजय खापर्डे, पंचायत समिती सदस्य गिरधारी हत्तीमारे, कोसबी सरपंच अल्का रामटेके, उपसरपंच कृष्णा कोरे, माजी पंचायत समिती सभापती पद्मा परतेकी उपस्थित होते.
पुढे बोलताना बडोले यांनी, वीज वितरण कंपनीने शेतकऱ्यांना विज कनेक्शन देण्याचा रेकार्ड केला असून यामुळे शेतकऱ्यांच्या तक्र ारी कमी होत आहेत. त्यात आता खोबा, कोसमतोंडी व केशारी येथे लवकरच नवीन उपकेंद्राचे काम सुरु करण्यात येईल. क्षेत्रनिहाय वीज पुरवठा ग्राहकांना व्यवस्थितपणे देणे हे कंपनीचे काम आहे. शेंडा व दल्ली परिसरातील शेतक री व ग्राहकांना वीज वितरण कंपनीकडून सरासरी बिल देण्यात येत असल्याच्या तक्र ारी आहेत तरी मीटर रिडींगनुसार बिल देण्यात यावे असे त्यांनी सांगितले. तसेच मागास व दुर्गम क्षेत्रातील विजेचा प्रश्न सोडविण्यासाठी इन्फ्रा-२ चे योग्य नियोजन करावे. राज्यातील दलित वस्त्यांना योग्यप्रकारे वीज पुरवठा व्हावा, तसेच वीज उपकरणांच्या देखभाल दुरुस्तीसाठी सामाजिक न्याय विभागाकडून ४०० ते ५०० कोटी रुपये देण्यात येईल. शेतकऱ्यांनीसुध्दा वीज बिलाचा भरणा त्वरीत करु न वीज कंपनीला सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी केले.
अध्यक्षस्थानावरुन बोलतांना रंगारी यांनी, कोहमारा येथे नव्याने तयार झालेल्या उपकेंद्रामुळे या भागातील नागरिक व शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. शेतकऱ्यांच्या व घरगुती वीज ग्राहकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी वीज वितरण कंपनीने वेळीच लक्ष द्यावे असेही त्या म्हणाल्या. प्रास्ताविकातून जनवीर यांनी, २ कोटी ५० लक्ष रु पये खर्च करु न तयार करण्यात आलेल्या कोहमाराच्या या उपकेंद्रामुळे परिसरातील २० गावांना लाभ होणार आहे.
विकासकामे करताना कंपनीला वीज ग्राहकांनी सहकार्य केल्यास समस्यांवर मात करण्यास मदत होईल, असे मत व्यक्त केले. संचालन उपअभियंता परिहार यांनी केले. आभार कार्यकारी अभियंता वाकडे यांनी मानले. या कार्यक्रमाला कोहमारा परिसरातील ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. (शहर प्रतिनिधी)