सुसाट धावणाऱ्या वाहनांमुळे वाढले अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2019 05:00 AM2019-11-11T05:00:00+5:302019-11-11T05:00:02+5:30

हा मार्ग खडबडीत असल्यामुळे मार्गावर प्रत्येक वाहनाची वाहतूक संथ गतीने व्हायची. मात्र या मार्गाचे नव्याने डांबरीकरण झाल्यामुळे गुळगुळीत रस्त्यावर जड वाहनेही सुसाट धावत आहेत. त्यामुळे आजघडीला रस्ता ओलांडून जाणे फार कठिण झाले आहे. अपघातही वाढले असून ठिकठिकाणी संबंधित विभागाने गतिरोधक बसवावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Increased accidents due to Fast running of vehicles | सुसाट धावणाऱ्या वाहनांमुळे वाढले अपघात

सुसाट धावणाऱ्या वाहनांमुळे वाढले अपघात

Next
ठळक मुद्देमार्गदर्शनाची गरज : ठिकठिकाणी गतिरोधक बसविण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
रावणवाडी : दोन राज्यातील दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या गोंदिया-बालाघाट राज्य मार्गावर सतत लहानमोठ्या वाहनांची अहोरात्र वर्दळच असते. पूर्वी हा मार्ग खडबडीत असल्यामुळे मार्गावर प्रत्येक वाहनाची वाहतूक संथ गतीने व्हायची. मात्र या मार्गाचे नव्याने डांबरीकरण झाल्यामुळे गुळगुळीत रस्त्यावर जड वाहनेही सुसाट धावत आहेत. त्यामुळे आजघडीला रस्ता ओलांडून जाणे फार कठिण झाले आहे. अपघातही वाढले असून ठिकठिकाणी संबंधित विभागाने गतिरोधक बसवावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
गोंदिया-बालाघाट राज्य मार्गावर रावणवाडी पोलीस ठाण्यासमोर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आहे. ५० मीटर समोर अंतरावर जि.प. प्राथमिक शाळा आहे. या शाळेला लागूनच मुख्य बस थांबा आहे. या बस थांब्यावरुन पूर्वेस बिरसी हवाई पट्टीला जोडणारा मुख्य मार्ग आहे. पश्चिम दिशेला दासगाव परिसरात जाणारा मुख्य डांबरी मार्ग आहे. मुख्य बस थांबा चहूमार्गांनी जोडला आहे. याच मार्गावर १०० मीटर अंतरावर चारगाव, सिरपूर व मोगर्रा जाणारा मुख्य डांबरी मार्ग आहे. या मार्गावरही लहानमोठ्या वाहनांची सतत रेलचेलच असते. या मार्गावरुन येणारे वाहन सरळ मुख्य मार्गावर येत असल्यामुळे हा जोड रस्ता अपघात होण्याचा मुख्य पॉर्इंट बनलेला आहे.
या ठिकाणी अनेकदा लहानमोठ्या अपघाताच्या घटना घडून अनेकांना जखमी व्हावे लागले आहे. हा मार्ग गावाच्या मध्यभागातून असल्यामुळे मार्ग ओलांडून जाणे मुलाबाळांना कठीण झाले आहे. रस्ता ओलांडताना अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी या राज्य मार्गावर तातडीने गतीरोधक लावण्यात यावे, अशी मागणी ग्रामीण नागरिकांनी केली आहे.

Web Title: Increased accidents due to Fast running of vehicles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.