शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
2
Top Marathi News Live: ही माझी शेवटची सभा, आता ४ मे नंतर शपथविधी सोहळ्याला येईन: PM मोदी
3
अनिल अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर ४८% नं वधारला; ३० रुपयांच्या वर पोहोचला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
4
३४९,३९९ चे रिचार्ज नाही, २० रुपयांचा बॅलन्स तुमचे सिम कार्ड ठेवणार अॅक्टिव्ह...! ट्रायने सर्वच कंपन्यांना घालून दिलाय हा नियम...
5
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
6
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
7
'चला हवा येऊ द्या'च्या दुसऱ्या सीझनमध्ये परत तीच टीम का नव्हती? श्रेया बुगडे म्हणाली...
8
बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु
9
Swapna Shastra: भीतीदायक स्वप्नांचा असतो भविष्याशी संबंध? नक्की काय सांगतं स्वप्न शास्त्र?
10
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
11
Ilma Afroz : वडिलांचं छत्र हरपलं, शेतात घाम गाळला; आईने पणाला लावलं आयुष्य, लेक झाली IPS अधिकारी
12
"आज सासऱ्यांना मिस करतेय, रिंकूची खेळी त्यांच्यासाठी होती"; KKR जिंकल्यावर प्रिया सरोज भावूक
13
बर्थडे पार्टीत रक्ताचा सडा! चेहऱ्याला केक लावल्याच्या रागातून भाजप नेत्याच्या भावांसह तिघांची हत्या
14
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
15
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
16
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
17
Samudrik Shastra: सामुद्रिक शास्त्रानुसार हसण्याच्या पद्धतीवरून ओळखता येतात माणसाचे गुण-दोष!
18
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग आजपासून सुरू, प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद
19
Video - हृदयद्रावक! जन्मदात्या आईचा क्रूरपणा; १८ महिन्यांच्या लेकीला फेकलं नाल्यात अन्...
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्पांतील जलसाठ्यात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2020 05:00 IST

मान्सूनच्या सुरूवातीचा जून व जुलै महिना कोरडा-कोरडाच गेला. त्यामुळे जिल्ह्यात सुरूवातीपासून पावसाची तूट दिसून येत होती. मात्र मागील २-३ दिवस जिल्ह्यात सर्वदूर बरसलेल्या संततधार पावसामुळे काही तालुक्यांत अतिवृष्टीची नोंद घेण्यात आली होती. शिवाय या संततधार पावसामुळे यंदा प्रथमच नदी-नाल्यांना पाणी आल्याचे दिसले. त्यामुळे जिल्हा पाणीदार झाला होता. या संततधार पावसामुळे उकाड्यापासून दिलासा मिळाला असतानाच शेतकरीही खूश झाला आहे.

ठळक मुद्देसंततधार पावसामुळे दिलासा : तरीही २५७ मिमी पावसाची तूट कायम

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मागील २-३ दिवस संततधार बरसलेल्या पावसामुळे जिल्हा पाणीदार झाला आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील प्रकल्पांत जलसाठा सातत्याने वाढत आहे. असे असतानाही जिल्ह्यात अद्याप अपेक्षेच्या तुलनेत पाऊस बरसलेला नसल्याने २५७ मीमी. पावसाची तूट कायम आहे. त्यामुळे जिल्ह्यात पावसाची गरज आहे.मान्सूनच्या सुरूवातीचा जून व जुलै महिना कोरडा-कोरडाच गेला. त्यामुळे जिल्ह्यात सुरूवातीपासून पावसाची तूट दिसून येत होती. मात्र मागील २-३ दिवस जिल्ह्यात सर्वदूर बरसलेल्या संततधार पावसामुळे काही तालुक्यांत अतिवृष्टीची नोंद घेण्यात आली होती. शिवाय या संततधार पावसामुळे यंदा प्रथमच नदी-नाल्यांना पाणी आल्याचे दिसले. त्यामुळे जिल्हा पाणीदार झाला होता. या संततधार पावसामुळे उकाड्यापासून दिलासा मिळाला असतानाच शेतकरीही खूश झाला आहे. मात्र गुरूवारी (दि.१३) दुपारपासून पावसाने उघाड दिली आहे.मात्र या पावसामुळे जिल्ह्यातील प्रकल्पांत जलसाठा वाढत असल्याचे दिसत आहे. शुक्रवारी (दि.१४) जिल्ह्यातील इटियाडोह प्रकल्पात ५२.३० टक्के, पुजारीटोला प्रकल्पात ६९.१८ टक्के, सिरपूर प्रकल्पात ४४.२४ टक्के तर कालीसरार प्रकल्पात ९.५० टक्के जलसाठ्याची नोंद घेण्यात आली. शिवाय प्रकल्पांतील जलसाठ्यात वाढ होत आहे. असे असताही मात्र अद्याप २५७ मीमी पावसाची तूट कायम आहे.जिल्ह्यात १४ आॅगस्ट पर्यंत ८६९.६ सरासरी पाऊस अपेक्षित आहे. मात्र यंदा आतापर्यंत ६१२.८१ सरासरी पाऊस बरसलेला आहे.पुजारीटोला प्रकल्पाची दारे उघडण्याची शक्यतापाटबंधारे विभागातील नियमांनुसार १५ आॅगस्टपर्यंत प्रकल्पांत ७४ टक्के जलसाठा ठेवायचा असून त्यापेक्षा जास्त होत असल्याचे पाणी सोडावे लागते. त्यानुसार, पुजारीटोला प्रकल्पात १४ आॅगस्ट रोजी सायंकाळपर्यंत ६९.१८ टक्के जलसाठ्याची नोंद घेण्यात आली असून त्यात वाढ होत आहे. अशात पाऊस बरसल्यास जलसाठ्यात वाढ होणार असल्याने दार उघडण्याची शक्यता निर्माण होऊ शकते.आणखीही दमदार पावसाची गरजमागील ४-५ दिवसांत बरसलेल्या पावसामुळे आता कुठे जिल्ह्यात पाऊस बरसल्यासारखे वाटत आहे. सुरूवातीचे जून व जुलै हे २ महिने कोरडेच गेल्याने तेव्हापासूनच जिल्ह्यात पावसाची तूट निर्माण झाली आहे. आताही जिल्ह्यात पावसाची तूट कायम असून त्याची सरासरी २५७ एवढी आहे. आताही सरासरी भरून काढण्यासाठी जिल्ह्यात आणखीही दमदार पावसाची गरज दिसून येत आहे.

टॅग्स :DamधरणRainपाऊस