धान खरेदीची मुदत वाढवा

By Admin | Updated: June 26, 2015 01:32 IST2015-06-26T01:32:25+5:302015-06-26T01:32:25+5:30

सडक अर्जुनी तालुक्यातील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांच्या माध्यमातून शासनाच्या आधारभूत हमी भावाने सडक अर्जुनी, डोंगरगाव/स.,

Increase the purchase period | धान खरेदीची मुदत वाढवा

धान खरेदीची मुदत वाढवा

केंद्रांवर गर्दी : आदिवासी विविध कार्यकारी संस्थेची मागणी
खजरी : सडक अर्जुनी तालुक्यातील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांच्या माध्यमातून शासनाच्या आधारभूत हमी भावाने सडक अर्जुनी, डोंगरगाव/स., कनेरी, खजरी या धान खरेदी केंद्रावर रबी धानाचा पेरा उत्पादन जास्त आहे. त्या तुलनेत धान खरेदीची सुरूवात आदिवासी विकास महामंडळाने उशिरा केली. त्यामुळे धान खरेदी केंद्रावर गर्दी वाढली आहे. शासनाने धान खरेदीची मुदत ३० जून असल्याने खरेदी केंद्रावरील पडलेला शेतकऱ्यांचा धान काटा करणे शक्य नाही.
शासनाने प्रतिक्विंटल २५० रुपये प्रोत्साहन राशी देण्याचे घोषित केल्याने खरेदी केंद्रावर धानाची आवक वाढली. डोंगरगाव खरेदी केंद्रावर सात हजार ५९५ क्विंटल खरेदी झाली असून केंद्रावर शेतकऱ्यांचा चार हजार क्विंटल धान उघड्यावर पडून आहे. पावसामुळे नियमित काटा करणे शक्य नाही. संस्थेजवळील गोदाम खरीप हंगामातील धानाने भरले असल्याने रबी धान खरेदीसाठी जागा नाही. महामंडळाने खरेदी केलेला गोदामातील धान उचल केले नसल्याने उर्वरित उघड्यावर पडलेल्या धानाची खरेदी कशी करावी, असा प्रश्न संस्थांना पडला. महामंडळाने गोदामातील धानाची उचल करावी, अशी मागणी होत आहे.
अनेक खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांचा धान पाण्यात भिजला असून शेतकऱ्यांची नुकसान झाले. तर काही शेतकऱ्यांनी पावसाच्या भीतीने घरीच धान साठवून ठेवले आहे. शासनाच्या दिलेल्या मुदतीत केंद्रावरील धान मोजणे शक्य नाही.
तरी धान खरेदीची मुदत २० जुलैपर्यंत वाढवावी व खरेदी केलेला माल सोबतच उचल करावा, अशी मागणी डोंगरगाव संस्थेचे अध्यक्ष रमेश इळपाते, उपाध्यक्ष धनलाल परशुरामकर, मीताराम देशमुख व शेतकऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)

Web Title: Increase the purchase period

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.