गांजा विक्रेता घनश्याम अग्रवाल याच्या पोलीस कोठडीत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:31 IST2021-05-20T04:31:28+5:302021-05-20T04:31:28+5:30

गोंदिया : कामठा येथील नामे घनश्याम ऊर्फ मोनू हरिचंद अग्रवाल (वय २५) याच्या घरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ७० ...

Increase in police custody of cannabis seller Ghanshyam Agarwal | गांजा विक्रेता घनश्याम अग्रवाल याच्या पोलीस कोठडीत वाढ

गांजा विक्रेता घनश्याम अग्रवाल याच्या पोलीस कोठडीत वाढ

गोंदिया : कामठा येथील नामे घनश्याम ऊर्फ मोनू हरिचंद अग्रवाल (वय २५) याच्या घरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ७० किलो २५० ग्रॅम वजनाचा गांजा १३ मे रोजी रात्री ९.१० वाजता कामठा येथून पकडला. त्या आरोपीला न्यायालयाने १७ मे पर्यंत पाेलीस कोठडी सुनावली होती. या पाेलीस कोठडीत पुन्हा वाढ करण्यात आली असून, ही वाढ २१ मे पर्यंत करण्यात आली आहे.

कामठा येथील आरोपी घनश्याम ऊर्फ मोनू हरिचंद अग्रवाल याने लॉकडाऊनच्या पूर्वी गांजा आणून ठेवला होता; परंतु लॉकडाऊनमुळे त्याचा गांजा विक्री होऊ शकला नाही. परिणामी, तो गांजा स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पकडला. पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांनी कसून चौकशी केली असता, आरोपीने तो गांजा जगदलपूर येथून सिमेंटच्या बोरीच्या मधात टाकून देवरीपर्यंत आणला. देवरीवरून तो गांजा कामठा येथे आणल्याची माहिती त्याने दिली. या प्रकरणात त्याच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे. जप्त केलेला गांजा ७० किलो २५० ग्रॅम वजनाचा असून, या गांजाची किंमत बाजारभावाप्रमाणे ८ लाख ४३ हजार रुपये आहे.

Web Title: Increase in police custody of cannabis seller Ghanshyam Agarwal