ग्रामीण भागात कोविड बेडची संख्या वाढवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:31 IST2021-04-23T04:31:05+5:302021-04-23T04:31:05+5:30
गोंदिया : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. त्यामुळे रुग्णालयातील बेड्स कमी पडत आहेत. ऑक्सिजन व रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा ...

ग्रामीण भागात कोविड बेडची संख्या वाढवा
गोंदिया : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. त्यामुळे रुग्णालयातील बेड्स कमी पडत आहेत. ऑक्सिजन व रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. त्यामुळे ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रातील बेड्सची संख्या वाढविण्यात यावी. तसेच रुग्णांची गैरसोय होणार नाही, याची काळजी घेण्याचे निर्देश खा. सुनील मेंढे यांनी आढावा बैठकीत आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.
येथील केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनेंतर्गत आढावा बुधवारी आढावा बैठकीत घेण्यात आला. या बैठकीला आमदार विजय रहांगडाले, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीपकुमार डांगे, जिल्हा आरोग्य अधिकारी नितीन कापसे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अधिष्ठाता नरेश तिरपुडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अमरिश मोहबे, भाजप जिल्हा सचिव गज्जू फुंडे, नगर परिषद मुख्याधिकारी करण चव्हाण, तालुका वैद्यकीय अधिकारी वेदप्रकाश चौरागडे उपस्थित होते. यावेळी बेडची संख्या वाढविणे, ऑक्सिजन उपलब्ध करणे, आदींचे नियोजन करणे, या विषयावर चर्चा करण्यात आली. आढावा बैठकीनंतर खा. मेंढे यांनी जिल्हा क्रीडा संकुलातील
बॅडमिंटन हालची पाहणी केली. तसेच या ठिकाणी १०० खाटांचे कोविड केअर सेंटर सुरु करण्याचे निर्देश आरोग्य विभागाला दिले.