जिल्ह्यात दुधाचे उत्पादन वाढवा
By Admin | Updated: March 13, 2016 02:09 IST2016-03-13T02:09:43+5:302016-03-13T02:09:43+5:30
पश्चिम महाराष्ट्रातल्या जिल्ह्यात लाखो लिटर दूधाचे उत्पादन होत असतानाच गोंदिया जिल्ह्यात फक्त १०-२० हजार लीटर दुधाचे उत्पादनही होत नाही.

जिल्ह्यात दुधाचे उत्पादन वाढवा
पालकमंत्री बडोले : दासगाव येथील पशुवैद्यकीय दवाखान्याचे लोकार्पण
गोंदिया : पश्चिम महाराष्ट्रातल्या जिल्ह्यात लाखो लिटर दूधाचे उत्पादन होत असतानाच गोंदिया जिल्ह्यात फक्त १०-२० हजार लीटर दुधाचे उत्पादनही होत नाही. ही स्थिती बदलायची असून शेतकऱ्यांनी शेतीला जोड म्हणून पशुपालन व दुग्ध व्यवसाय सुरू केला पाहिजे. शासनाच्या व्यवस्थांचा फायदा घेत नागरिकांनी पशुधन विकासावर जोर देऊन जिल्ह्यात दुधाचे उत्पादन वाढवावे असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
गुरूवारी (दि.१०) तालुक्यातील ग्राम दासगाव येथे नवनिर्मित पशु वैद्यकरीय दवाखानाच्या लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार गोपालदास अग्रवाल होते. याप्रसंगी आमदार अग्रवाल यांनी, पशुसंवर्धनावर विशेष लक्ष दिल्यामुळे मागील ५ वर्षात गोंदिया विधानसभेत क्षेत्रातील सर्व श्रेणी २ च्या पशुवैद्यकीय दवाखान्यांचा दर्जा वाढवून श्रेणी १ करण्यात आली आहे. सोबतच कुडवा येथे आधुनिक पॉलिक्लिनीकची स्थापना करण्यात आल्याचे सांगीतले.
याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष उषा मेंढे, उपाध्यक्ष रचना गहाणे, पशुसंवर्धन सभापती छाया दसरे, आरोग्य सभापती पी.जी.कटरे, महिला व बालकल्याण सभापती विमल नागपुरे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डी.बी.गावडे, पंचायत समिती सभापती स्नेहा गौतम, उपसभापती ओमप्रकाश भक्तवर्ती, अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जयवंत पडवी, जिल पशुसंवर्धन अधिकारी डॉ. एस.एम.चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य रजनी गौतम, पंचायत समिती सदस्य रामराज खरे, सरपंच कविता मेश्राम, उपसरपंच दिलीप मिश्रा व अन्य उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)