२८ फेब्रुवारीपर्यंत लॉकडाऊनमध्ये वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:54 IST2021-02-06T04:54:21+5:302021-02-06T04:54:21+5:30

राज्यात ३१ जानेवारीपर्यंतच्या लॉकडाऊन संदर्भात मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या होत्या. त्या आनुषंगाने जिल्ह्याकरिता आदेश निर्गमित करण्यात आले आहे. ...

Increase in lockdown till 28th February | २८ फेब्रुवारीपर्यंत लॉकडाऊनमध्ये वाढ

२८ फेब्रुवारीपर्यंत लॉकडाऊनमध्ये वाढ

राज्यात ३१ जानेवारीपर्यंतच्या लॉकडाऊन संदर्भात मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या होत्या. त्या आनुषंगाने जिल्ह्याकरिता आदेश निर्गमित करण्यात आले आहे. तसेच शासनाने निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे या स्तरावर

वेळोवेळी आदेश निर्गमित करण्यात आले आहे. राज्य शासनाने ३१ जानेवारीपर्यंतच्या लॉकडाऊनच्या कालावधीत आता २८ फेब्रुवारीपर्यंत वाढ केली आहे.

यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष दीपक कुमार मीना यांच्या आदेशाद्वारे जिल्ह्यात लॉकडाऊन कालावधीत २८ फेब्रुवारीपर्यंत वाढ करण्यात आली आहे.

तसेच या आदेशांमध्ये वेळोवेळी केलेल्या सुधारणांसह निर्बंधित बाबी वगळून इतर उपक्रम अटी व शर्तींसह सुरू राहतील.

आदेशाचे पालन न करणाऱ्या संबंधित व्यक्ती संस्था अथवा समूहाने साथरोग प्रतिबंधक कायदा १८९७, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ तसेच भारतीय दंड संहिता १८६० नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल आणि पुढील कार्यवाही करण्यात येईल.

Web Title: Increase in lockdown till 28th February

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.