ग्रामसभेच्या उपस्थिती भत्यात घसघशीत वाढ

By Admin | Updated: November 20, 2014 22:55 IST2014-11-20T22:55:37+5:302014-11-20T22:55:37+5:30

पंचायत राज व्यवस्थेने ग्रामसभेला विशेष अधिकार दिले असले तरी बहुतांश गावात ग्रामसभेला नगन्य उपस्थिती असते. ग्रामपंचायत सदस्यही ग्रामसभांना उपस्थित राहण्यास टाळाटाळ करतात.

Increase in the attendance of gram sabhas in the recession | ग्रामसभेच्या उपस्थिती भत्यात घसघशीत वाढ

ग्रामसभेच्या उपस्थिती भत्यात घसघशीत वाढ

गोंदिया : पंचायत राज व्यवस्थेने ग्रामसभेला विशेष अधिकार दिले असले तरी बहुतांश गावात ग्रामसभेला नगन्य उपस्थिती असते. ग्रामपंचायत सदस्यही ग्रामसभांना उपस्थित राहण्यास टाळाटाळ करतात. ही बाब लक्षात आल्याने शासनाने आता ग्रामसभेला उपस्थित भत्यात घसघशीत वाढ केली आहे.
शासनाच्या वतीने प्रत्येक ग्रामसभेला उपस्थित राहणाऱ्या सदस्याला २०० रूपये भत्ता दिला जाणार आहे. पंचायत राज व्यवस्थेत ग्रामपंचायत विकासाचा केंद्र बिंदू आहे. गावाचा विकासाचे नियोजन गावातच व्हावे यासाठी ग्रामसभेला विशेष अधिकार देण्यात आले आहे. ग्रामसभेत बहुमताने ठरविलेली कामे केली जातात मात्र बहुतांश गावांमध्ये ग्रामसभा म्हणजे केवळ सोपस्कार झाला आहे. गावकरीही उपस्थित राहत नाही. परिणामी शासनाच्या उद्देशाला तडा जातो. काही मोजकीच मंडळी गावाच्या विकासाचा निर्णय घेतात. हा प्रकार टाळण्यासाठी ग्रामविकास विभागाने पुढाकार घेत सभेला उपस्थित राहणाऱ्या सदस्यांना मानधन देण्याचा निर्णय घेतला. परंतु सुरूवातीला नाममात्र २५ रूपये भत्ता दिला जाता होता. त्यामुळे अनेक सदस्य मासिक सभेला पाठ फिरवित होते. आपल्या मानधनात वाढ करावी अशी मागणी त्यांनी केली होती. ही मागणी मान्य करीत आता या मागणीत घसघशीत आठ पट वाढ झाली आहे.
नव्या नियमानुसार मासिक सभेला उपस्थित राहणाऱ्या सदस्यांना २०० रूपये मानधन दिले जाणार आहे. यात ७५ टक्के वाटा शासनाचा तर २५ टक्के वाटा ग्रामपंचायातीला उचलावा लागणार आहे. यासोबतच सरपंच व उपसरपंचांना देण्यात येणाऱ्याा मानधनातही वाढ झाली आहे. ही वाढ गावच्या लोकसंख्येवर आधारित राहणार आहे. दोन हजार लोकसंख्या असलेल्या गावाला एक हजार रूपये दोन ते आठ हजार लोकसंख्या असलेल्या गावाला दीड हजार रूपये, तर आठ हजारापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावात दोन हजार रूपये मानधन मिळणार आहे. यातील ७५ टक्के वाटा हा शासन उचलणार आहे. वर्षभरात कितीही सभा झाला तरी उपस्थित भत्ता केवळ १२ सभांसाठीच देण्यात येणार आहे. त्यामुळे सदस्य १२ ही सभांना उपस्थित राहिल्यास त्याला वर्षभरांचे २४०० रूपये मिळणार आहेत.
ग्रामविकासाचा केंद्रबिंदू असलेल्या ग्रामसभांच्या बळकटीकरणासाठी शासनाने हे पाऊस उचलले आहे. आता ग्रामसभांना सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांवर गावकरीही मोठयÞा संख्येने उपस्थित राहतील, अशी अपेक्षा आहे. यातून गावाचा निश्चित विकास होणार असे नागरिकांमधून बोलल्या जात आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Increase in the attendance of gram sabhas in the recession

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.