अंगणवाडी सेविकांच्या भरतीसाठी २ वर्षाने वयोमर्यादेत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:35 IST2021-07-07T04:35:45+5:302021-07-07T04:35:45+5:30
गोंदिया : राज्यातील अंगणवाडी, मिनी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पदभरतीसाठी आता उमेदवारांना ३० ऐेवजी २ वर्षाने वयोमर्यादेत वाढ करून ...

अंगणवाडी सेविकांच्या भरतीसाठी २ वर्षाने वयोमर्यादेत वाढ
गोंदिया : राज्यातील अंगणवाडी, मिनी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पदभरतीसाठी आता उमेदवारांना ३० ऐेवजी २ वर्षाने वयोमर्यादेत वाढ करून आता कमाल मर्यादा ३२ करण्यात आली आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवर दोन वर्षाने वयोमर्यादेत वाढ करण्यात आली आहे. कोरोनामुळे विविध प्रकारच्या पद भरतीला विलंब झाला आहे. त्यामुळे ही वाढ करण्यात आली असून ती ३१ मार्च २०२२ पर्यंत होणाऱ्या पदभरतीसाठी लागू राहणार आहे.
अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यामध्ये ३० वर्षे ही वयाची अट होती. आता दोन वर्षे वाढवून या जागांसाठी ३२ वर्षे वयोमर्यादा करण्यात आली आहे, अशी माहिती उपमुख्य कार्यपालन अधिकारी महिला बालकल्याण संजय गणवीर यांनी दिली. गोंदिया जिल्ह्यात ४२ अंगणवाडी व २७ मिनी अंगणवाडी अशा ६९ अंगणवाड्यांची पदे भरली जाणार आहेत. या आधी नक्षलग्रस्त भागात झालेल्या भरतीच्या ठिकाणी जागा भरली जाणार नाही. अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ५ अंगणवाडी, १ मिनी, देवरी तालुक्यातील १०, ३ मिनी अंगणवाडी, सडक-अर्जुनी तालुक्यातील ६ अंगणवाडी, सालेकसा तालुक्यातील ४ अंगणवाडी, २ मिनी अंगणवाडी, गोंदिया क्रमांक १ मधील ४ अंगणवाडी, १ मिनी अंगणवाडी, गोंदिया क्रमांक २ मधील तालुक्यातील ३ अंगणवाडी, १ मिनी अंगणवाडी, गोरेगाव तालुक्यातील २ अंगणवाडी, ४ मिनी अंगणवाडी, तिरोडा तालुक्यातील ५ अंगणवाडी, १५ मिनी अंगणवाडी, आमगाव तालुक्यातील ३ अंगणवाडीमध्ये भरती केली जात आहे.