प्रसंगवधानातून वनवनवा आणला नियंत्रणात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:28 IST2021-04-24T04:28:56+5:302021-04-24T04:28:56+5:30
सध्या तेंदुपत्ता व मोहफूल संकलनाचा हंगाम सुरु आहे. त्यामुळे मोहफुले आणि तेंदुपत्ता संकलनासाठी काही नागरिक जंगलात आगी लावतात. त्यामुळे ...

प्रसंगवधानातून वनवनवा आणला नियंत्रणात
सध्या तेंदुपत्ता व मोहफूल संकलनाचा हंगाम सुरु आहे. त्यामुळे मोहफुले आणि तेंदुपत्ता संकलनासाठी काही नागरिक जंगलात आगी लावतात. त्यामुळे या दिवसात वनव्याचे घटना अधिक घडतात. इटखेडा बिटातील संरक्षित वन कक्ष क्रं. १०८२ मध्ये गुरुवारी रात्रीच्या सुमारास वनवा लागला. याची माहिती संतोष रोकडे यांनी वेळीच वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर वनविभागाचे कर्मचारी वेळीच फायर ब्लोअर मशीनसह घटनास्थळी दाखल झाले. फायर ब्लोअर मशीनच्या साहाय्याने आग वेळीच आटोक्यात आल्याने मोठा अनर्थ टळला.
..........
जंगलात आग लावणाऱ्यांवर कठोर कारवाईची गरज
तेंदुपत्ता आणि मोहफूल संकलनासाठी काही नागरिक जंगलात आगी लावतात. याच आगीचे रूपांतर वनव्यात होते. यामुळे अनेक मौल्यवान वनसंपत्ती नष्ट होते, तर अनेकदा वन्यप्राण्यांचा सुद्धा बळी जातो त्यामुळे जंगलात आगी लावणाऱ्यांवर वन व वन्यजीव विभागाने वेळीच कठोर कारवाई करण्याची मागणी वन्यप्रेमींकडून केली जात आहे.