शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करा ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:36 IST2021-09-09T04:36:09+5:302021-09-09T04:36:09+5:30

गोंदिया : शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करा यासह माध्यमिक शिक्षकांच्या विविध मागण्यांनासाठी भारतीय जनता पक्ष ...

Implement old pension scheme for teachers and non-teaching staff () | शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करा ()

शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करा ()

गोंदिया : शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करा यासह माध्यमिक शिक्षकांच्या विविध मागण्यांनासाठी भारतीय जनता पक्ष शिक्षक आघाडीच्यावतीने बुधवारी (दि.८) निदर्शन आंदोलन करण्यात आले. दरम्यान मागण्यांचे निवेदन माध्यमिक शिक्षणाधिकारी संजय डोर्लीकर यांना देण्यात आले.

निवेदनात, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जूनी पेन्शन योजना लागू करावी, शिक्षकांची रिक्तपदे त्वरीत भरण्यात यावी, दरमहा १ तारखेला वेतन मिळावे, वेतनास विलंब करणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात यावे, वरिष्ठ व निवड श्रेणीच्या प्रशिक्षणाच्या तारखा तात्काळ घोषित कराव्यात, १ नाेव्हेंबर २००५ पूर्वी अंशत: अनुदानित शाळांमध्ये नियुक्त शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे बंद केलेले भविष्य निर्वाह निधीचे खाते तात्काळ सुरू करावे, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची भविष्य निर्वाह निधीची रक्कम व वैद्यकीय प्रतिपूर्तीची रक्कम तत्काळ देण्यात यावी, शिक्षण सेवक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मानधन सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वाढविण्यात यावे या मागण्या नमूद आहेत. या आंदोलनात अरूण पारधी व भाजप शिक्षक आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते. शिक्षणाधिकारी डोर्लीकर यांना निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात भाजपचे जिल्हाध्यक्ष केशव मानकर, माजी आमदार हेमंत पटले, अरूण पारधी, गजेंद्र फुंडे, मनोज मेंढे, संजय कुळकर्णी, धनलाल ठाकरे यांच्यासह भाजप शिक्षक पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

Web Title: Implement old pension scheme for teachers and non-teaching staff ()