ग्रामीण भागात कोरोनासाठी उपाययोजना राबवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:29 IST2021-04-25T04:29:16+5:302021-04-25T04:29:16+5:30
बाराभाटी : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक रुग्णांचा उपचाराअभावी तर कुठे निष्काळजीपणाने निष्पाप जीव जात आहेत. यासाठीच ग्रामीण भागातही चांगल्या ...

ग्रामीण भागात कोरोनासाठी उपाययोजना राबवा
बाराभाटी : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक रुग्णांचा उपचाराअभावी तर कुठे निष्काळजीपणाने निष्पाप जीव जात आहेत. यासाठीच ग्रामीण भागातही चांगल्या उपाययोजना राबविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
ग्रामीण भागातील अनेक प्राथमिक आरोग्य केंद्र, आरोग्य उपकेंद्र, ग्रामीण रुग्णालयात कोरोना चाचणीच होत नाही. इकडे जा तिकडे जात असे सांगितले जात आहे. ताप, सर्दी, खोकला असल्यास नागरिक आरोग्य विभागाकडे धाव घेत आहे. तर अनेक अडचणी दाखवून आरोग्य विभागाचे कर्मचारी व अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप आहे. अनेक कोविड केंद्रावर ऑक्सिजन व बेडचे प्रमाण कमी आहे. आरोग्य विभागाचे संचालक पुणे व उपसंचालक नागपूर येथील यांनी तालुक्यातील कोविड केअर सेंटर आणि प्राथमिक आरोग्य केंद्राची पाहणी केल्यानंतर आरोग्यविषयक सोयी सुविधेत वाढ करण्याची गरज असल्याचे सांगितले होते. त्यामुळे आरोग्यविषयक उपाययोजना युद्धपातळीवर करण्याची गरज आहे.
.......
रॅट कीटचा तुटवडा
कोरोना वाढल्याने नागरिक तपासणीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि कोरोना चाचणी केंद्रावर जात आहेत; पण तिथे रॅट कीट नसल्याचे सांगितले जाते. रुग्ण संख्या वाढत असल्याने आरोग्य विभागाने पुरेशा प्रमाणात रॅट कीट उपलब्ध करून देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.