तातडीने समस्या मार्गी लावा

By Admin | Updated: March 16, 2017 00:27 IST2017-03-16T00:27:01+5:302017-03-16T00:27:01+5:30

तिरोडा तालुक्यातील कवलेवाडा येथे वैनगंगा नदीवर शेतकऱ्यांसाठी तयार करण्यात आलेले धापेवाडा उपसा सिंचन प्रकल्प रखडले आहे.

Immediately solve problems | तातडीने समस्या मार्गी लावा

तातडीने समस्या मार्गी लावा

दिलीप बन्सोड : धापेवाडा उपसा सिंचन प्रकल्प टप्पा एक व दोन
परसवाडा : तिरोडा तालुक्यातील कवलेवाडा येथे वैनगंगा नदीवर शेतकऱ्यांसाठी तयार करण्यात आलेले धापेवाडा उपसा सिंचन प्रकल्प रखडले आहे. सात वर्षे पूर्ण होवूनही टप्पा -१ चे काम अपूर्णच आहे. त्याचे काम तातडीने पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी माजी आमदार दिलीप बन्सोड यांनी कार्यकारी संचालक जलसंपदा विभाग नागपूर यांना केली आहे. त्याबाबत कार्यकारी अभियंता धापेवाडा उपसा सिंचन प्रकल्प तिरोडा मार्फत शेतकऱ्यांसह निवेदन दिले आहे.
टप्पा- १ मधील १०० टक्के शेतकऱ्यांच्या खरीप व रबी पिकांना सिंचन करणे, धापेवाडा उपसा सिंचन प्रकल्प टप्पा- १ मधून खळबंदा जलाशयात पाणी रबी व खरीप पिकांकरिता तात्काळ सुरू करणे, खळबंदा पाईप लाईनद्वारे संग्रामपूर जलाशयात एकोडी बस स्टँडवरुन स्वतंत्र पाईप लाईन एकोडी ते धामनेवाडा रोडजवळून टाकणे, खळबंदा पाईप लाईन द्वारे सहेसपूर येथील तलावात दांडेगाववरुन गेलेल्या कालव्यात पाणी टाकून तलाव भरणे व गंगाझरी येथील हरी तलावात गंगाझरी बस स्टँडवरुन पाईप लाईन तयार करुन गंगाझरी, हनुमानटोला, नवाटोला कालव्याने पाणी टाकणे, बोदलकसा, चोरखमारा, रिसाळा व गोरेगाव तालुक्यातील कटंगी कलपाथरी, गुमडोह या प्रकल्पात जाणाऱ्या पाईप लाईनचे काम तात्काळ करणे, टप्पा- २ मधील पंपगृहाचे काम तात्काळ सुरू करणे, प्रत्येक तलावाच्या सिंचन क्षेत्रातील कालव्याऐवजी शेतकऱ्यांना ज्या ठिकाणी पाणी सिंचन होत नाही त्या ठिकाणी पाटचारा अतिरिक्त वितरिका तयार करणे, भुराटोला (पालडोंगरी) येथील भुसंपादित झालेल्या जमिनीचे शेतकऱ्यांना पूणर्वसन अनुदान देणे व भुराटोला प्रकल्प त्वरित पूर्ण करणे, चिरेखनी शिवऱ्या कालव्याचे काम उपसा सिंचन विभागामार्फत करणे, घाटकुरोडा, चांदोरी बु. येथील कालव्याचे पूर्ण काम त्वरित करणे व अन्य ठिकाणी कामाची सूचना प्रस्ताव सादर करुन वरिष्ठांना कळवावे, असे निवेदन कार्यकारी अभियंता पी.एम. फाडके यांना देण्यात आले.
यावेळी उपस्थित आ. दिलीप बन्सोड, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रेम रहांगडाले, सभापती उषा किंदरले, उपसभापती डॉ. किशोर पारधी, जि.प. सदस्य प्रीती रामटेके, जि.प. सदस्य सुनिता मडावी, जि.प. सदस्य मनोज डोंगरे, पंचायत समिती सदस्य निता रहांगडाले, माया शरणागत, मनोहर राऊत, जागेश्वरी, कृष्णा भांडारकर, शोभेलाल दहीकर, पप्पू सैयद, घनशाम पारधी, सरपंच मुक्ता रहांगडाले, मनिराम हिंगे, नभी भालाधरी, मुन्ना पटले, राधेशाम गुरव, प्रल्हाद दखने, रामकुमार असाटी, भोजलाल नागपुरे, बबलदास रामटेके, जुनेवार सरपंच, भाऊराव गोंदुळे, माजी जि.प. उपाध्यक्ष पंचम बिसेन व मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

टप्पा-१ चे काम पूर्णत्वास आलेले आहे. फक्त काही ठिकाणी कामे सुरू आहेत व खळबंदा जलाशयात २६ जानेवारीला पाण्याच्या पाईप लाईनद्वारे चाचणी केली असून खरीप पिकांसाठी जून महिन्यात पाणी तलावात टाकण्यात येईल. संग्रामपूर, सहेशपूर, हरी तलाव यांचे सर्वे करुन प्रस्ताव सादर करणार व काही कामांचे सुधारित प्रशासकीय मान्यतेसाठी नाशिक येथे प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत. प्रस्ताव येताच टप्पा २, पंप गृहाचे काम व बोदलकसा जलाशयाच्या लाईनचे काम त्वरित टेंडर काढून करू. तसेच घाटुकरोडा कालव्याचेही काम करु.
- पी.एम. फाडके
कार्यकारी अभियंता

Web Title: Immediately solve problems

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.