घरकुल लाभार्थ्यांवरील अन्याय त्वरित दूर करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:29 IST2021-02-10T04:29:19+5:302021-02-10T04:29:19+5:30
बिरसी फाटा : तिरोडा पंचायत समितीने ग्राम वडेगाव येथील लाभार्थ्यांची नावे पंतप्रधान आवास योजनेच्या यादीतून कमी करून त्यांच्यावर ...

घरकुल लाभार्थ्यांवरील अन्याय त्वरित दूर करा
बिरसी फाटा : तिरोडा पंचायत समितीने ग्राम वडेगाव येथील लाभार्थ्यांची नावे पंतप्रधान आवास योजनेच्या यादीतून कमी करून त्यांच्यावर अन्याय केला आहे. अशात आता खंडविकास अधिकाऱ्यांनी यादीत त्वरित दुरुस्ती करून लाभार्थ्यांवरील अन्याय दूर करावा, अशी मागणी राजेश कावळे यांनी केली आहे; अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे
६ सप्टेंबर २०१६ व २४ ऑगस्ट २०१८ मध्ये वडेगाव ग्रामपंचायतच्या वतीने पंतप्रधान आवास योजनेतील ६०३ लाभार्थ्यांची यादी तिरोडा पंचायत समिती येथे शिफारशीनुसार पाठविली होती; परंतु मागील आठवड्यात पंचायत समिती येथून ऑनलाइन पोर्टलवर फक्त ३५५ लाभार्थ्यांचीच नावे दिसून येत आहेत, तर २४८ लाभार्थ्यांची नावे यादीत नसल्याने त्यांच्यावर अन्याय झाला आहे. त्यांच्यावर झालेला अन्याय त्वरित दूर करावा; अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा ग्रामपंचायत सदस्य राजेश कावळे, श्याम बिसेन, अहिल्या भेलावे, स्वप्नलता साखरे, ललिता चौधरी, दिलेश्वरी गौतम, मीनाक्षी जगने, निकिता धुवे, राजकुमार पटले, पवन बोदेले, भाग्यश्री केळवतकर यांनी दिला आहे.