बोनसची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात त्वरित जमा करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:29 IST2021-04-24T04:29:41+5:302021-04-24T04:29:41+5:30
तिरोडा : सध्या सर्वत्र कोरोनाने थैमाने घातले आहे. अशात लॉकडाऊनमुळे उद्याेगधंदे सर्वच बंद आहेत. शेतीच्या कामावरही परिणाम झाला आहे. ...

बोनसची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात त्वरित जमा करा
तिरोडा : सध्या सर्वत्र कोरोनाने थैमाने घातले आहे. अशात लॉकडाऊनमुळे उद्याेगधंदे सर्वच बंद आहेत. शेतीच्या कामावरही परिणाम झाला आहे. त्यामुळे शासनाने शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर बोनसची रक्कम त्वरित जमा करावी, अशी मागणी माजी आ.विजय रहांगडाले यांनी केली आहे.
सद्यस्थितीत राज्यात कोविड १९ची दुसरी लाट सुरू असून, परिस्थिती आटोक्यात आणण्याकरिता महाराष्ट्र शासनाने कडक लॉकडाऊनचे निर्देश दिले आहेत. गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने कृषीवरच आधारित आहे. या दोन्ही जिल्ह्यांत धान उत्पादक शेतकऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. जिल्ह्यातील ९० टक्के शेतकऱ्यांनी आपले धान शासकीय धान खरेदी केंद्रावर विक्री केले आहे. शासनाने शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रति ५० क्विंटलपर्यंत ७०० रुपये बोनस देण्याची घोषणा केली आहे. मात्र, धानाची विक्री करून चार महिन्यांचा कालावधी लोटला, तरी अद्यापही शेतकऱ्यांना बोनसची रक्कम देण्यात आली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिककोंडी झाली असून, शेतकऱ्यांना त्वरित बोनस मिळाल्यास काेविड काळात आर्थिक कोंडी सोडविण्यास मदत होईल. त्यामुळे शासनाने त्वरित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात बोनसची रक्कम जमा करावी, अशी मागणी आ.विजय रहांगडाले यांनी केली आहे.