मध्यप्रदेश मार्गावर अवैध प्रवासी वाहतुकीला ऊत

By Admin | Updated: October 22, 2014 23:20 IST2014-10-22T23:20:47+5:302014-10-22T23:20:47+5:30

राज्य परिवहन महामंडळ आगार आणि स्थानिक वाहतूक पोलिसांच्या दुर्लक्षामुळे बालाघाट मार्गावर अवैध प्रवासी वाहतुकीला ऊत आला आहे. दोन्ही विभागांनी आपले खिसे भरण्याकरिता जाणूनबजून

Illegal traffic on the road of Madhya Pradesh goes down | मध्यप्रदेश मार्गावर अवैध प्रवासी वाहतुकीला ऊत

मध्यप्रदेश मार्गावर अवैध प्रवासी वाहतुकीला ऊत

गोंदिया : राज्य परिवहन महामंडळ आगार आणि स्थानिक वाहतूक पोलिसांच्या दुर्लक्षामुळे बालाघाट मार्गावर अवैध प्रवासी वाहतुकीला ऊत आला आहे. दोन्ही विभागांनी आपले खिसे भरण्याकरिता जाणूनबजून दुर्लक्ष केल्याचा आरोप प्रवासी करू लागले आहेत.
गोंदिया आगारातून बालाघाट, मलाजखंड, वाराशिवणी, लालबर्रा, रजेगाव यासह अन्य ठिकाणीही लांब पल्ल्यांच्या गाड्या सुरू आहेत. परंतु जिल्ह्यातील परवाने नसलेल्या प्रवासी वाहतुकीकडे एसटी आगार व प्रादेशिक परिवहन विभागाचे दुर्लक्ष आहे. परिणामी विनापरवाना वाहनांत प्रवाशांना प्रवास करणे भाग पडत आहे.
एस.टी. आगारातून १०० मिटरपर्यंत अवैध वाहने उभी न करण्याचा नियम आहे तसेच सूचना फलकही लावण्यात आले होते. मात्र अवैध प्रवासी वाहने या नियमाला केराची टोपली दाखवीत एसटी आगारातून प्रवाशांची पळवापळवी करतात. याकडे वाहतूक पोलिसांचे नेहमीच दुर्लक्ष असते.
अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या चारचाकी वाहनांचा गोंदियातील वाहतुकीचे स्थळ जयस्तंभ, कुडवा नाका, मरारटोली आहे. मुख्य एसटी थांब्याजवळ तर चक्क सहाचाकी अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांची दिवसरात्र रेलचेल असते. वाहनांवर कारवाई करण्याकरिता प्रत्येक ठिकाणी वाहतूक पोलिसांनी संबनधीत विभागाने नियुक्ती केली; पण ते केवळ बुजगावणे ठरले आहेत. जिल्ह्यात अनेक बेरोजगारांनी बँकेतून कर्ज काढून वाहने खरेदी केली. या बेरोजगारांप्रति सहानुभूती दाखविण्याच्या नावाखाली व्यवसायास पोलिसांकडून परवानगी दिली जाते. परंतु ही परवानगी मोफत नसते. वाहतूक पोलिसांनी ‘अर्थ’ पूर्ण व्यवहार आणि वाहनांच्या देखभाल दुरुस्तीवर बराच खर्च होत असल्यामुळे या अवैध वाहतुकदारांमध्ये जीवघेणी स्पर्धा सुरू आहे.
प्रवासी मिळविण्यावरुन अनेकदा वाहनधारकांमध्ये हाणामारीचे प्रकारहसी घडले आहेत. याचा परिणाम एसटीच्या उत्पन्नावर होत आहे. विभागाच्या तोट्याकडे दुर्लक्ष करून अधिकारी आणि कर्मचारी आपले खिसे गरम करण्यात लागले असल्याचा आरोप प्रवासी करू लागले आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Illegal traffic on the road of Madhya Pradesh goes down

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.