दारुबंदीच्या गावात अवैध दारु विक्री
By Admin | Updated: May 1, 2015 00:09 IST2015-05-01T00:09:05+5:302015-05-01T00:09:05+5:30
ठाणा गावात व बसस्थानकाजवळ अवैध दारु विक्री सुरु आहे. गावात पाच वर्षापासून दारुबंदी आहे.

दारुबंदीच्या गावात अवैध दारु विक्री
आमगाव : ठाणा गावात व बसस्थानकाजवळ अवैध दारु विक्री सुरु आहे. गावात पाच वर्षापासून दारुबंदी आहे. मात्र काही व्यक्ती नियम आजूला सारुन अवैध दारु विक्री करतात.
गुरुवारी बसस्थानकावर बिट जमादार गाते यांच्या बरोबर गावकऱ्यांची अवैध दारु विक्री संदर्भात तू-तू मै-मै झाली. हप्ता वसुलीच्या नावावर बिट जमादार कारवाई करीत नाही व अवैध दारु विक्रेते हप्ता पोलिसांना देत असल्यामुळे कुणालाच घाबरत नाहीत पोलीस विभागाने धाड टाकली तर अवैध दारु विक्रेत्याजवळ दारु मिळत नाही. अधिकारी गेले की अगोदर विक्रेत्यांना निरोप दिला जातो. त्यामुळे कारवाईकरीता गेलेल्या अधिकाऱ्यांना रिकाम्या हाताने परतावे लागते.
बस स्थानकावर जवळपास दोन तीन अवैध दारु दुकाने आहेत. शेजारीच दोन शाळा आहेत. प्रवासी व चारचाकी गाड्यांची नेहमीच रेलचेल असते. गावातील तंटामुक्त अध्यक्षाला कोण अवैध दारु विकतो याची माहिती आहे. मात्र पोलीस पाटिल व तंटामुक्त समिती अध्यक्ष उगाच वाद नको म्हणून कोणतीही कारवाही करीत नाही, असा गावकऱ्यांचा आरोप आहे. सतत पाच वर्षापासून ठाणा गावात दारुबंदी आहे. मात्र हप्ता वसुलीच्या नावावर बिट जमादार लक्ष देत नाही. गावकऱ्यांनी बिट जमादार यांना विचारले तर समाधानकारक उत्तर मिळत नाही. (तालुका प्रतिनिधी)