जंगलातील नाल्यातून होत आहे रेतीचा अवैध उपसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:27 IST2021-03-19T04:27:48+5:302021-03-19T04:27:48+5:30
या परिसरातील वनरक्षकाने, वनमजुराने अथवा तलाठी, मंडल अधिकाऱ्याने कसल्याही प्रकारची कारवाई सोडा चौकशी केली नाही. बकिटोला नाल्यामधून ५० ते ...

जंगलातील नाल्यातून होत आहे रेतीचा अवैध उपसा
या परिसरातील वनरक्षकाने, वनमजुराने अथवा तलाठी, मंडल अधिकाऱ्याने कसल्याही प्रकारची कारवाई सोडा चौकशी केली नाही. बकिटोला नाल्यामधून ५० ते १०० ब्रास रेतीचा उपसा करण्यात आल्याचे बोलले जाते. या रेतीची तस्करांनी बकिटोला, पांढरी, कॉलोनी, गोंगले, डुंडा, खाडीपार गावांमध्ये अधिक भावाने विक्री केल्याचे बाेलले जाते. भर जंगलातून रस्ता तयार करुन रेतीची अवैधपणे वाहतूक केली जात असताना या प्रकाराकडे वन विभागाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होणे, ही गंभीर बाब आहे. विशेष म्हणजे या जंगल परिसरात वन्यप्राण्यांचासुध्दा वावर असून, या परिसरातून रात्री बेरात्री रेतीची अवैध वाहतूक सुरु असल्याने वन्यप्राणीसुध्दा धोक्यात आले आहेत. जंगलातून रस्ता तयार करुन वन विभागाच्या नाल्यातून रेतीचा अवैध उपसा सुरु असताना ही बाब वन विभागाच्या लक्षात न आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करुन यातील दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
........
कोट....
बकिटोला नाल्यातील अवैध रेती उपसा होत आहे. या विषयाची तक्रार मिळाली आहे. चौकशीकरिता वन अधिकाऱ्यांना पाठवून दोषी व्यक्तींवर कारवाई करण्यात येईल.
- राजेश पाचभाई, वन परिक्षेत्र अधिकारी, सडक अर्जुनी