शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
3
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
4
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
5
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
6
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
7
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
8
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
9
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
10
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
11
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
12
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
13
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
14
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
15
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
16
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
17
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
18
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
20
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा

आरक्षणाला धक्का लागला तर राजकारण सोडेन !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2024 17:40 IST

प्रफुल्ल पटेल: अर्जुनी मोरगाव येथे कार्यकर्ता मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी मोरगाव : लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी महायुती सरकार संविधान बदलणार असल्याचा प्रचार प्रसार केला. लोकांची दिशाभूल करण्याचे काम त्यांनी केले. आपण अपप्रचाराला बळी पडले. देशाचे संविधान संपविण्याची कुणाचीही ताकद नाही. त्यामुळे आपण निश्चिंत राहा. आरक्षणाला धक्का लागणार नाही. अन्यथा राजकारण सोडेन, अशी ग्वाही खा. प्रफुल्ल पटेल यांनी दिली. 

शुक्रवारी (दि.२६) स्थानिक वात्सल्य सभागृहात आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते. यावेळी आ. मनोहर चंद्रिकापुरे, जि.प. उपाध्यक्ष यशवंत गणवीर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रेम रहांगडाले, नगराध्यक्ष मंजूषा बारसागडे, अविनाश ब्राह्मणकर, नामदेव डोंगरवार, दानेश साखरे, डॉ. सुगत चंद्रिकापुरे, भोजराम रहेले, राकेश लंजे, चित्ररेखा मिश्रा, माधुरी पिंपळकर, सुशीला हलमारे उपस्थित होते.

खा. पटेल म्हणाले, गोंदिया-भंडारा जिल्ह्यात पावसाने थैमान घातले. शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यांना नुकसानभरपाई मिळण्यासंदर्भात पाठपुरावा करू. केंद्र व राज्य सरकारने जनता जनार्दनाच्या हितासाठी अनेक योजना आणल्या. मोठ्या प्रमाणावर विकास कामे केली. शेतीमालाला बोनस देण्याची प्रथा २००९-१० मध्ये प्रफुल्ल पटेलांनी आणली.

शेतकऱ्यांना प्रधानमंत्री सन्माननिधी मिळतो. आता मोफत वीज देण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील ९३ हजार महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे. आम्ही हे केले. ते केले हे आम्हालाच सांगावे लागते ही बाब चुकीची आहे. या कामांना विसरून चालता येणार नाही. विचारसरणी बदला. भरभरून केलेल्या कामांची जाणीव ठेवा. हिमतीने लोकांपर्यंत जाऊन विकासकामे सांगा, असा सल्ला कार्यकर्त्यांना दिला.

आम्हाला १५०० नको, मुलांना रोजगार द्याया कार्यकर्ता मेळाव्यात महिला वर्गही उपस्थित होता. भाषण आटोपताच खा. पटेल बाहेर जात असताना महिलांनी आम्हाला १५०० नको, मुलांना रोजगार द्या, अशी मागणी त्यांच्याकडे केली.

१० वर्षांत जे झाले नाही ते साडेतीन वर्षांत झाले२०२६ मध्ये नवीन मतदारसंघाची पुनर्रचना होणार आहे. महिला आरक्षण येणार आहे. त्यामुळे राज- कारणात बरेच बदल बघायला मिळणार असल्याचेही ते म्हणाले. आ. मनोहर चंद्रिकापुरे यांनी गेल्या १० वर्षात जी कामे झाली नाहीत ती अवघ्या साडेतीन वर्षात करून दाखविली. गेल्या १५ दिवसांत ३४२ कोटींचा निधी मंजूर केला. इटियाडोह, उमरझरी, चुलबंद, झाशीनगर सिंचन प्रकल्पांसाठी भरीव निधीची तरतूद केली असल्याचे त्यांनी सांगितले. 

टॅग्स :Praful Patelप्रफुल्ल पटेलPoliticsराजकारणreservationआरक्षणgondiya-acगोंदिया