शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

नेतेच कंत्राटदार झाले, तर विकास कसा होईल: नितीन गडकरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2024 14:37 IST

Gondia : गोंदिया, आमगाव येथे प्रचारसभा

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : केंद्र व राज्य शासनाकडून अनेक विकास कामे मंजूर केली जातात, पण अनेक ठिकाणी नेतेच कंत्राटदार झाल्याने या कामांचा बोजवारा उडाला आहे. ही स्थिती सर्वच पक्षांत असल्याचे दुर्दैवाने म्हणावे लागते. राजकारणाचा उद्देश केवळ पैसा कमाविणे हा नसून, त्यातून समाजकारण करून लोकांचे कल्याण करणे हा असला पाहिजे. राजकारणाचा अर्थ राष्ट्र कारण असायला हवा. देशात सुशासन असायला हवे, असे प्ररखड मत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी (दि.८) येथे आयोजित सभेत केले.

महायुतीतील गोंदिया विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार विनोद अग्रवाल आणि आमगाव विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार संजय पुराम यांच्या निवडणूक प्रचारार्थ गोंदिया येथे आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते. ना. नितीन गडकरी म्हणाले, देशाला, राज्याला विकासाची दूरदृष्टी असणाऱ्या नेतृत्वाची गरज आहे. मतदारांनी सुद्धा आपल्या भागाचा विकास कोण करू शकतो, कोण सक्षम नेतृत्व करू शकतो, या सर्व गोष्टींचा विचार करूनच मतदान करण्याची गरज आहे. योग्य नेतृत्व मिळाले, तर निश्चितच त्या भागाचा कायापालट झाल्याशिवाय राहत नाही. 

देशाला योग्य नेतृत्वाची गरज असल्याचे सांगितले. अलीकडे राजकारणाचा स्तर खालावत चालला विरोधकांकडून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. लोकसभा निवडणुकीत संविधान बदलणार असा भ्रम निर्माण करून लोकांची दिशाभूल करण्यात आली. पण, संविधान बदलण्याची ताकद कुणातच नाही, कुणीही संविधानात बदल करू शकत नाही, हे पाप केवळ काँग्रेसनेच आणीबाणीच्या काळादरम्यान केल्याचा आरोप त्यांनी केला. देशात भूकमरी, बेरोजगारी वाढविण्याचे काम काँग्रेसनेच केल्याची टीका गडकरी यांनी केली.

२७ वर्षांच्या नेतृत्वाला जनता कंटाळली गोंदिया विधानसभा मतदारसंघाचे २७ वर्षे नेतृत्व करणाऱ्यांनी या क्षेत्राचा कुठलाच विकास केला नाही. केवळ दुसऱ्यांनी आणलेल्या कामांना स्वतःचे लेबल लावण्याचे काम केले. त्यामुळे अशा नेतृत्वाला जनता कंटाळली होती. मतदा- रांनीच मागील निवडणुकीत त्यांना मतदारांनी घरी बसविल्याची टीका खा. प्रफुल्ल पटेल यांनी केली.

गोंदिया ड्रायपोर्ट तयार करण्याची फाइल तयारतीन-चार वर्षांपूर्वीच गोंदिया ड्रायपोर्ट तयार करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. या प्रकल्पाची फाइल तयार होऊन पडली आहे. पण, जागा उपलब्ध न झाल्याने ड्रायपोर्ट तयार झाला नाही. त्वरित जागा उपलब्ध करून दिल्यास या प्रकल्पाचे काम सुरू होईल. त्यामुळे गोंदिया येथून विविध देशांत तांदूळ निर्यात करण्यास मदत होऊन उद्योगधंद्यांना चालना मिळेल व रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असे सांगितले. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Nitin Gadkariनितीन गडकरीgondiya-acगोंदिया