स्वत:तील क्षमता ओळखून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 06:00 IST2019-08-31T06:00:00+5:302019-08-31T06:00:25+5:30

कादंबरी बलकवडे म्हणाल्या, स्पर्धा परीक्षेत कुठल्याही शार्टकट पद्धतीने यश प्राप्त करता येत नाही तर त्याकरिता खूप संघर्ष करुन जिद्द व चिकाटीने अभ्यास करावा लागतो. वेळेचे नियोजन करणे बंधनकारक आहे. त्या माध्यमातून नियोजन करुन स्पर्धा परीक्षेचा प्रवास गाठत ठरलेल्या ध्येयापर्यंत निश्चित रुपात पोहोचता येते.

Identify your potential and study the competition test | स्वत:तील क्षमता ओळखून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करा

स्वत:तील क्षमता ओळखून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करा

ठळक मुद्देकादंबरी बलकवडे : स्पर्धा परीक्षेतील गुणवंत व त्यांच्या पालकांचा सत्कार

लोकमत न्यूज नेटवर्क
देवरी : एमपीएससी, सरळ सेवा भरती व इतर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतांना स्वत:तील क्षमता, बुद्धी व ऊर्जेचे आत्मपरिक्षण करुन स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करावा तेव्हा स्पर्धा परीक्षेत यश प्राप्त होते, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे यांनी केले.
दीनबंधू ग्रामीण विकास संस्था देवरी द्वारा आयोजित स्पर्धा परीक्षेतील कर्तृत्ववान यशवंत व त्यांच्या पालकांच्या सत्कार गुरूवारी करण्यात आला. या वेळी मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. या वेळी प्रामुख्याने नगराध्यक्ष कौशल्या कुंभरे, उपविभागीय अधिकारी रविंद्र राठोड, नगर पंचायत उपाध्यक्ष आफताब शेख, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले, समाज कल्याणचे सहायक आयुक्त अनिल वाळके, दीनबंधू ग्रामीण विकास संस्थेचे अध्यक्ष कुलदीप लांजेवार मंचावर उपस्थित होते. कादंबरी बलकवडे म्हणाल्या, स्पर्धा परीक्षेत कुठल्याही शार्टकट पद्धतीने यश प्राप्त करता येत नाही तर त्याकरिता खूप संघर्ष करुन जिद्द व चिकाटीने अभ्यास करावा लागतो. वेळेचे नियोजन करणे बंधनकारक आहे. त्या माध्यमातून नियोजन करुन स्पर्धा परीक्षेचा प्रवास गाठत ठरलेल्या ध्येयापर्यंत निश्चित रुपात पोहोचता येते.
स्वत:चा अनुभव सांगत स्पर्धा परीक्षेविषयी उपस्थित विद्यार्थ्यांशी प्रश्नोत्तरच्या स्वरुपात संवाद साधला.उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांनी आपल्या मार्गदर्शनातून स्वत:चा यशोप्रभात सांगत असताना त्यांनी अडचणींना सामोरे जाऊन यश कसे प्राप्त झाले याचा प्रेरणादायी प्रवास विद्यार्थ्यांना सांगितला.या वेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देवरी तालुक्यातील स्पर्धा परीक्षेत यश संपादन करणाऱ्या निखील संतोष बन्सोड, नितीन राजाराम बरैया या विद्यार्थ्यांचा त्यांच्या पालकांसह सत्कार करण्यात आला.
माध्यमिक शालांत परीक्षेत जिल्ह्यातून प्रथम आलेली अनुश्री हेमंत भेंडारकर या विद्यार्थिनीचा सुध्दा या वेळी सत्कार करण्यात आला. तालुक्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी स्वत:चा व्यक्तीमत्व विकास करण्यासाठी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्याचे आवाहन कुलदीप लांजेवार यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन प्रा.जी.एम.मेश्राम यांनी तर आभार सी.यू.उईके यांनी मानले. कार्यक्रमासाठी हर्षवर्धन मेश्राम, गोपाल चनाप, अरुण मानकर, सितेश ईश्वर, सचिन वासनिक यांनी सहकार्य केले.

Web Title: Identify your potential and study the competition test

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.