मतदारांच्या आशीर्वादाचा मीच हकदार- अग्रवाल

By Admin | Updated: October 8, 2014 23:29 IST2014-10-08T23:29:17+5:302014-10-08T23:29:17+5:30

क्षेत्रातील जनतेने मला खूप स्रेह व आशीर्वाद देवून मागील १० वर्षांपासून या क्षेत्राचे प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली. या क्षेत्रातील जनतेसाठी माझी जी जबाबदारी होती ती निभवण्यासाठी मी पूर्ण

I deserve the blessings of the voters- Agarwal | मतदारांच्या आशीर्वादाचा मीच हकदार- अग्रवाल

मतदारांच्या आशीर्वादाचा मीच हकदार- अग्रवाल

गोंदिया : क्षेत्रातील जनतेने मला खूप स्रेह व आशीर्वाद देवून मागील १० वर्षांपासून या क्षेत्राचे प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली. या क्षेत्रातील जनतेसाठी माझी जी जबाबदारी होती ती निभवण्यासाठी मी पूर्ण प्रामाणिकपणे विकास कार्यांना गती देण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे मतदारांचे आशीर्वाद मिळण्यासाठी खऱ्या अर्थाने मीच पात्र आहे, असे प्रतिपादन गोपालदास अग्रवाल यांनी केले.
सिव्हील लाईन परिसरातील हनुमान मंदिरापासून निघालेल्या जनसंपर्क पदयात्रा रॅलीदरम्यान ते बोलत होते. गेल्या पाच वर्षांत गोंदिया विधानसभा क्षेत्रात नवनवीन नेत्यांचा जन्म झाला. त्यांनी या क्षेत्राच्या विकासात अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न केला. असेच नेते या क्षेत्राचे प्रतिनिधित्व मिळण्यासाठी जनतेकडून अपेक्षा करीत आहेत. विकासाची गती कायम ठेवण्यासाठी मी सदैव प्रयत्न केले. मी क्षेत्रातील जनतेच्या विकासासाठी प्रयत्न केले असेल तर मी मतदारांच्या आशीर्वादाचा हकदार आहे. त्यामुळे कोणाच्याही भूलथापांना बळी न पडता आपल्या मनात विकासाचे विचार ठेवून विजयी करण्याचा संकल्प बाळगा, असे आ अग्रवाल म्हणाले.
यावेळी माजी नगरसेवक शकील मन्सुरी म्हणाले, सिव्हील लाईन परिसरातील रस्त्यांकडे नगर परिषदेचे सदस्य व राकाँच्या उमेदवाराने नेहमीच दुर्लक्ष केले. निवडणूक जिंकली तेव्हापासून त्यांनी या परिसरात एकही रस्ता किंवा नाली बनविण्यासाठी प्रयत्न केले नाही. परिसरातील नागरिकांच्या मूलभूत गरजा स्वच्छ रस्ते व नाल्या आहेत. परंतु हे कार्य करण्यातही ते अपयशी ठरले. ज्यांनी आपले वार्ड सिव्हील लाईन परिसरात एक रस्ता व नालीसुद्धा बनविली नाही, ते आता आमदार बनण्याचे स्वप्न बघत आहेत. कोण कशासाठी योग्य आहे व क्षेत्राच्या विकासासाठी मागील १० वर्षांपासून कोण सतत प्रयत्न करीत आहे, हे गोंदिया विधानसभा क्षेत्रातील जनता ओळखते. हनुमान मंदिरापासून ते डॉ.चौरसियापर्यंतचा रस्त्याचे बांधकाम त्यांनी आपल्या कार्यकाळात करवून घेतले.
यावेळी प्रदेश प्रतिनिधी पृथ्वीपालसिंग गुलाटी, शहर अध्यक्ष अशोक चौधरी, रवी हलमारे, अशोक लंजे, अमरचंद अग्रवाल, मनिष गुप्ता, अनिल शहारे, जग्गू वासनिक, लोकेश रहांगडाले, नरेंद्र बिसेन, कैलाश कापसे, गुड्डू शेख, कमलेश नशिने, देवा रूसे, गुलाब बोपचे, सुशील ठवरे, विकास बंसल, अकरमभाई, गणेश जाधव, आलोक मोहती, बाबू पठान, मुकेश बारई, चिकू अग्रवाल, आशा जैन, श्याम चौरे, विक्की गुलाटी, उमेंद्र भेलावे आदी अनेक जण उपस्थित होते

Web Title: I deserve the blessings of the voters- Agarwal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.