हुश्श.. पाच तालुके झाले कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2021 05:00 IST2021-08-07T05:00:00+5:302021-08-07T05:00:12+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया :  मागील दोन महिन्यांपासून कोरोनाला पूर्णपणे उतरती कळा लागली आहे. आठपैकी पाच तालुके पूर्णपणे कोरोनामुक्त ...

Hushh .. five talukas became coronamukta | हुश्श.. पाच तालुके झाले कोरोनामुक्त

हुश्श.. पाच तालुके झाले कोरोनामुक्त

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया :  मागील दोन महिन्यांपासून कोरोनाला पूर्णपणे उतरती कळा लागली आहे. आठपैकी पाच तालुके पूर्णपणे कोरोनामुक्त झाले असून उर्वरित तीन तालुक्यात केवळ सात कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यामुळे जिल्हा येत्या आठवडाभरात कोरोनामुक्त होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही निश्चितच जिल्हावासीयांसाठी दिलासादायक बाब आहे. 
कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने शुक्रवारी (दि.६) ४५७ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यापैकी ४१० नमुन्यांची आरटीपीसीआर तर ४७ नमुन्यांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. यात एकही नमुना कोरोना बाधित आढळले नाही. कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट शून्य टक्के आहे. 
कोरोनाचा संसर्ग आता पूर्णपणे आटोक्यात आला. त्यामुळे ही निश्चितच जिल्हावासीयांसाठी दिलासादायक बाब आहे. कोरोनाचा संसर्ग आटोक्यात असला तरी जिल्हावासीयांना पूर्वी इतकीच काळजी घेण्याची गरज आहे. आपले थोडेही दुर्लक्ष कोरोनाला पुन्हा आमंत्रित करण्यास कारणीभूत ठरू शकते. 
कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत एकूण ४३८११२ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यापैकी २२०१९८ नमुन्यांची आरटीपीसीआर तर २१७९१४ नमुन्यांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. यात ४११९३ नमुने कोरोना निगेटिव्ह आले. यापैकी ४०४८४ बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. 

सर्वाधिक ॲक्टिव्ह रुग्ण अर्जुनी मोरगाव तालुक्यात 
- जिल्ह्यातील गोरेगाव, आमगाव, सालेकसा, देवरी, सडक अर्जुनी हे पाच तालुके पूर्णपणे कोरोनामुक्त झाले आहे. तर गोंदिया १ आणि तिरोडा तालुक्यात १ रुग्ण आहे. तर सर्वाधिक पाच कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण अर्जुनी मोरगाव तालुक्यात आहे. 
६२४,१९६ नागरिकांचे लसीकरण 
- कोरोनाला प्रतिबंध लावण्यासाठी लसीकरण हे महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळेच लसीकरणाची टक्केवारी वाढविण्यावर सध्या भर दिला जात आहे. जिल्ह्यात सध्या १९४ केंद्रावरून लसीकरण मोहीम सुरू असून आतापर्यंत ६,२४,१९६ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत जवळपास ५० टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे.

 

Web Title: Hushh .. five talukas became coronamukta