पत्नीच्या खुनाचा प्रयत्न करणाऱ्या पतीला तीन वर्षांचा कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:35 IST2021-07-07T04:35:47+5:302021-07-07T04:35:47+5:30
गोंदिया : शहराच्या सिव्हिल लाइन येथील नीलेश आंबाडारे यांच्या ब्युटीपार्लरमध्ये कामावर असलेल्या पिंकी श्रीवास (२७) यांच्या खुनाचा प्रयत्न पती ...

पत्नीच्या खुनाचा प्रयत्न करणाऱ्या पतीला तीन वर्षांचा कारावास
गोंदिया : शहराच्या सिव्हिल लाइन येथील नीलेश आंबाडारे यांच्या ब्युटीपार्लरमध्ये कामावर असलेल्या पिंकी श्रीवास (२७) यांच्या खुनाचा प्रयत्न पती आरोपी योगेंद्र खुशाल श्रीवास (३१) रा. कुंजाबाई बगीचा रा. नगर गोंदिया याला जिल्हा सत्र न्यायालयाने ३ वर्षांचा कारावास सुनावला आहे. ही सुनावणी ५ जुलै रोजी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. ए.ए.आर. अवटी यांनी केली.
पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन आरोपीने चाकूने पोटावर मारून २ एप्रिल २०१८ ला तिचा खून करण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणात गोंदिया शहर पोलिसात भादंविच्या कलम ३०७, ४५०, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा तपास शहर पोलीस ठाण्यातील तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक विवेक नार्वेकर यांनी केला होता. या प्रकरणात ६ साक्षीदारांना न्यायालयात तपासण्यात आले. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.ए.ए.आर.अवटी यांनी सुनावणी करताना कलम ३०७ अंतर्गत ३ वर्षांचा कारावास व २०० रुपये दंड केला. दंड न भरल्यास १५ दिवसांचा कारावास, कलम ४५० अंतर्गत ३ वर्षांचा कारावास व २०० रुपये दंड केला. दंड न भरल्यास १५ दिवसांचा कारावास, कलम ५०६ अंतर्गत १ वर्षाचा कारावास व १०० रुपये दंड ठोठावला. दंड न भरल्यास ७ दिवसांचा कारावास ठोठावला आहे. न्यायालयात सरकारची बाजू सरकारी वकील ॲड. वसंत चुटे, ॲड. कैलास खंडेलवाल यांनी मांडली. न्यायालयीन कामकाजासाठी पोलीस कर्मचारी पटले, किरसान, अजय मटाले व महेंद्र भुरी यांनी सहकार्य केले.