वन्यप्राण्यांची शिकार करणारे जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2018 00:25 IST2018-12-30T00:24:12+5:302018-12-30T00:25:04+5:30
जवळील विहिरगाव बडर्याच्या शेत शिवारातील लागून असलेल्या क्षेत्र क्रमांक ७३३ संरक्षीत वनात रात्रीच्या वेळी विद्युत प्रवाहाने वन्यप्राण्यांची शिकार करण्याचा प्रकार सुरु होता.

वन्यप्राण्यांची शिकार करणारे जाळ्यात
लोकमत न्यूज नेटवर्क
बोंडगावदेवी : जवळील विहिरगाव बडर्याच्या शेत शिवारातील लागून असलेल्या क्षेत्र क्रमांक ७३३ संरक्षीत वनात रात्रीच्या वेळी विद्युत प्रवाहाने वन्यप्राण्यांची शिकार करण्याचा प्रकार सुरु होता. दरम्यान याप्रकरणी अर्जुनी मोरगाव विद्युत व वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी मुद्देमालासह तिघांना ताब्यात घेतले. ही घटना शुक्रवारी (दि.२८) रात्री घडली.
प्राप्त माहितीनुसार विहिरगाव बर्ड्या परिसरात आठवड्याभरापासून रात्रीच्या वेळी विद्युत पुरवठा जाण्याचा नित्यक्रम सुरु होता. विजेचा लपंडाव एकाएकी का होतो याचे कारण विद्युत विभागाला सुद्धा कळत नव्हते. याचा उलगडा करण्यासाठी विद्युत विभागाच्या कर्मचाºयांनी गुरूवार आणि शुक्रवारी या परिसरातील जंगलात रात्री गस्त घातली. सानगडीवरुन येणाºया ११ हजार केव्हीचा विद्युत तारांवर आकडा टाकून वायर शेत शिवारात पसरवून वन्यप्राण्यांची शिकार केली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला. तर काहीजण विहिरगाव बिटातील सागवान व कडु लिंबाचे झाडे कापून नेली जात असल्याचे आढळले.
विद्युत विभागाच्या अधिकाºयांनी याची माहिती बाराभाटी क्षेत्र सहाय्यक कार्यालयाला दिली. दरम्यान वनविभागाने चौकशी अंती विहिरगाव-बर्ड्या येथील कन्हैया नागो साखरे (५५), दत्तू पांडुरंग कोसरे (४८), धनंजय दत्तू कोसरे (२२) या तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून सागवान चिराण पाट्या ०.१८६ घमी, कडुलिंब चिराण ०.०६५ घमी लाकूड जप्त करण्यात आले.
या तिघांवर वन गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास क्षेत्र सहाय्यक एच.एच.शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली बीटगार्ड परसगाये, परशुरामकर करीत आहेत.