ग्रामीण कारागिरांवर उपासमारीचे संकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:47 IST2021-02-05T07:47:03+5:302021-02-05T07:47:03+5:30
वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करा नवेगावबांध : हिंस्र वन्यप्राण्यांनी शेतशिवार व गाव-परिसरात शिरकाव करून मनुष्य व पाळीव प्राण्यांवर हल्ला करून जखमी ...

ग्रामीण कारागिरांवर उपासमारीचे संकट
वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करा
नवेगावबांध : हिंस्र वन्यप्राण्यांनी शेतशिवार व गाव-परिसरात शिरकाव करून मनुष्य व पाळीव प्राण्यांवर हल्ला करून जखमी करणे किंवा त्या प्राण्यांना मृतपाय करणे सुरू केले आहे. हिंस्र प्राण्यांच्या धुमाकुळामुळे जंगल प्रवण व त्यास लागून असलेल्या भागात अधिवास करणारे नागरिक चांगलेच भयभीत झाले असून, वनविभागाने वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. वन्यजीवांचे संरक्षण करणे गरजेचे असले तरी याकडे दुर्लक्ष होत आहे.
शहरातील मजुरांच्या हाताला कामे केव्हा
अर्जुनी-मोरगाव : येथे नगरपंचायत अस्तित्वात आल्यापासून गेल्या पाच वर्षात शहरातील एकाही मजुराला मग्रारोहयोची कामे मिळाली नाही. त्यामुळे मजुरांवर बेरोजगार होऊन उपासमारीची वेळ आली आहे. मुलांचे भविष्य व उदरनिवार्हाचा गंभीर प्रश्न उभा ठाकल्याने शहरातील मजुरांना मग्रारोहयोची कामे देण्यात यावी, अशी मागणी करीत राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाच्या वतीने उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
कोरोनामुळे विकासाची घडी विस्कटली
केशोरी : गाव विकास करण्यासाठी ग्रामपंचायतचे उत्पन्नाचे स्त्रोत असलेले प्रमुख माध्यम मालमत्ता, पाणी व दिवाबत्ती कर जमा होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मात्र मार्च महिन्यापासून आजपर्यंत दहा महिन्यांचा कालावधी संपला असून, कराची रक्कम ग्रामपंचायतला कोरोनाच्या प्रभावामुळे वसूल करता आली नाही. त्यामुळे गाव विकासाची घडी विस्कटल्याचे चित्र आहे.
वातावरणातील बदलामुळे भीती
गोंदिया : कोरोना विषाणू महामारीचे संकट डोक्यावर घोंगावत असतानाच अचानक होत असलेल्या वातावरणातील बदलामुळे नागरिकांना सर्दी, खोकला, ताप व डोकेदुखीसारख्या आजारांचा सामना करावा लागत आहे. यामुळे मात्र नागरिकांमध्ये भीतीचे सावट निर्माण होऊन प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ओपीडीमध्ये रुग्णांची संख्या वाढल्याचे दिसून येत आहे. वातावरणातील बदलामुळे रुग्णांच्या संख्येत वाढ मेडिकलच्या ओपीडीतसुद्धा वाढ झाल्याचे चित्र आहे.
केव्हा तयार होणार रस्ता
केशोरी : अर्जुनी-मोरगाव तालुक्याला जाण्यासाठी प्रमुख मार्ग केशोरी गावाच्या मध्यभागातून जात असल्याने हा रस्ता अत्यंत वर्दळीचा झाला असून, धोक्याचा बनला आहे. हा रस्ता अरुंद आणि घरे रस्त्याच्या कडेला लागून असल्याने अनेकदा लहान-मोठे अपघात घडले आहेत. या रस्त्याला पर्याय म्हणून बायपास रस्ता अजूनही तयार झाला नाही.
दुर्गंधीमुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर
गोंदिया : येथील रेल्वेस्थानकालगत प्रभू रोडवर मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जातो. कित्येकदा त्यातून दुर्गंध पसरतो. त्यामुळे या परिसरात घाणच घाण पसरून दुर्गंधीयुक्त वातावरण तयार होते.
कोरोनामुळे खेळाडूंचे भविष्य अंधारात
देवरी : शासनाने आदेश काढून बंदी हटवली आहे. मात्र याला क्रीडाक्षेत्र स्पर्धांसाठी तसेच मैदानावरील सरावासाठी अद्याप क्रीडा विभागाने कोणताही आदेश काढला नसल्याने खेळाडूंचे भविष्य अंधारात आहे.
रस्त्यावरील खड्डे बुजवा
गोंदिया : शहरातील रस्ते मोठ्या प्रमाणात उखडले असून, त्यावर खड्डे पडलेले आहेत. पावसाळ्यात त्यामुळे नागरिकांना रहदारीला फारच त्रास होतो. रस्त्यांच्या या दुर्गतीमुळे अपघातांची शक्यता नाकारता येत नाही.
प्रवासी निवाऱ्यांची मागणी
मुंडीकोटा : तिरोडा तालुक्यातील नवेझरी या गावी प्रवासी निवारागृह होते; पण जीर्ण होऊन जमीनदोस्त झाले आहे. या ठिकाणी प्रवासी निवारागृह असणे फार गरजेचे आहे. नवेझरी गावासाठी ही बाब फार खेदाची आहे. नवेझरी या गावी छोटीसी बाजारपेठ आहे. दर शुक्रवारी आठवडी बाजार भरत असतो. गांगला परिसरातील १० ते १५ खेडे गावांचा समावेश येत असतो. या गावी दिवसभर येणाऱ्या जाणाऱ्यांची वर्दळ असते. तिरोडा आगाराची तिरोडा ते भंडारा (नवेझरी) मार्ग करडी ही बससेवा सुरू आहे. या मार्गाने दिवसभर बस धावत असतात. पण या गावी प्रवासी शेड नाहीत. त्यामुळे या परिसरातील प्रवासी हॉटेल अथवा पानटपरीत बसून एसटीची वाट बघत असतात. आपला वेळ घालवित असतात. उन्हाळ्यात, पावसाळ्यात प्रवाशांची फार फजिती होत असते. प्रवाशांची गैरसोय लक्षात घेता आमदार निधीतून प्रवासी निवारा तयार करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.