दीड कोटींची घेतली बोगस हमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2017 00:53 IST2017-05-03T00:53:17+5:302017-05-03T00:53:17+5:30
गोंदियाच्या गणेश नगरातील कृष्णकुंज अपार्टमेंटमध्ये राहणारे गौरवकुमार प्रकाश उपाध्ये (२७) याची संमती न घेता चार

दीड कोटींची घेतली बोगस हमी
चौघांवर गुन्हा दाखल : दहा धनादेशांवर बोगस स्वाक्षरी
गोंदिया : गोंदियाच्या गणेश नगरातील कृष्णकुंज अपार्टमेंटमध्ये राहणारे गौरवकुमार प्रकाश उपाध्ये (२७) याची संमती न घेता चार आरोपींनी त्याच्या कंपनीच्या नावे दीड कोटींची बँकेची खोटी हमी घेतली. तसेच त्याच्या संमतीशिवाय दहा धनादेशांवर बोगस स्वाक्षरी करून व्यापार करणाऱ्या चौघांवर गोंदिया शहर पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
आरोपी अमर चिमणानी (४२) रा. राठी आशीर्वाद कॉलनी गोंदिया, विशाल खटवाणी (२८) रा. राठी १०३, १०४ कृष्णकुंज अपार्टमेंट गणेशनगर, राज्य सहकारी विपणन संघ बालाघाट मध्यप्रदेशचे डीएमओ अंकीत तिवारी, लेखापाल रावत या चौघांनी १३ एप्रिल रोजी गौरवकुमार उपाध्ये यांच्या सहमतीशिवाय दीड कोटींच्या बँक हमीवर खोटी स्वाक्षरी मिळविली. त्यांच्या सहमतीशिवाय दहा धनादेशांवर गौरवकुमार यांची खोटी स्वाक्षरी करून डीएमओ कार्यालय बालाघाट येथे सादर केले.
सदर आरोपींनी २० लॉट धान उचलून गौरव यांची फसवणूक केली. तक्रारीवरून गोंदिया शहर पोलिसांनी भादंविच्या कलम ४२०, ४६८, ४७१, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.