मानवाधिकारतर्फे तहसीलदारांना निवेदन
By Admin | Updated: September 29, 2016 00:20 IST2016-09-29T00:20:51+5:302016-09-29T00:20:51+5:30
आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएशन शाखा तिरोडाच्या वतीने विदर्भ चेअरमेन इरफान मलसनसोबत तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

मानवाधिकारतर्फे तहसीलदारांना निवेदन
तिरोडा : आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएशन शाखा तिरोडाच्या वतीने विदर्भ चेअरमेन इरफान मलसनसोबत तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
तिरोडा उपजिल्हा रुग्णालयात सोनोग्राफीची मशीन असताना त्याचा नियमित वापर होत नाही. स्त्रियांच्या बाळंतपणाच्यावेळी स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर वेळेवर हजर राहत नाही. बहुतेक रुग्णांना केटीएस जिल्हा रुग्णालयात स्थांतरित करण्यात येते व तिरोडा उपजिल्हा रुग्णालयात उपचार होत नाही, अशा समस्यांचा निवेदनात उल्लेख आहे.
या समस्या सोडविण्याची मागणी मागणी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएशन (व्ही/एल) भारत सरकारद्वारे यांचे वरिष्ठ पदाधिकारी विदर्भ प्रदेश अध्यक्ष इरफान मलसान, जिल्हा अध्यक्ष सी.जी. कुरैशी, असगर अली सय्यद, उपाध्यक्ष अरशद खॉ पठान, तिरोडा ग्रामीण अध्यक्ष पप्पू सय्यद, अमीन जव्हेरी, पंकज देहलीवाल, सुनील बारापात्रे, सुबोधसिंग बैस, अविनाश रोहिले, खुशाल भोंडेकर आदींनी केली आहे.