हम दोस्त है सेवा समिती सदस्यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:22 IST2021-05-28T04:22:07+5:302021-05-28T04:22:07+5:30
गोंदिया : होम आयसोलेशनमध्ये असलेल्या कुटुंबांना नि:शुल्क भोजन वाटप करून अशा या कठीण समयी त्यांचे मदत करणाऱ्या हम दोस्त ...

हम दोस्त है सेवा समिती सदस्यांचा सत्कार
गोंदिया : होम आयसोलेशनमध्ये असलेल्या कुटुंबांना नि:शुल्क भोजन वाटप करून अशा या कठीण समयी त्यांचे मदत करणाऱ्या हम दोस्त हे सेवा समिती सदस्यांचा येथील माहेश्वरी महिला मंडळाने सत्कार केला.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कित्येक कुटुंबांतील सर्वच सदस्य कोरोनाबाधित झाल्याने त्यांच्या घरात स्वयंपाक करणाराही कुणी उरला नव्हता. अशात हम दोस्त हे सेवा समितीच्या वतीने अशा कुटुंबांना त्यांच्या घरापर्यंत जेवण पोहोचवून त्यांची वेळ भागवून देण्यात आली. समितीच्या या कार्या रवि डागा, लुपेश मेश्राम, प्रदीप सोनी, रौनक सिंघानिया, महेश सोनछात्रा, अर्पित अग्रवाल व आकाश डागा यांचे सहकार्य लाभले. या कार्याची दखल घेत माहेश्वरी महिला मंडळाच्या जिल्हाध्यक्ष मंगला अशोक साबू, तालुकाध्यक्ष रमा मुंदडा, सचिव छाया मुंदडा, उषा डागा, रचना पनपालिया, गंगा डागा यांनी माहेश्वरी भवन येथे हम दोस्त सेवा समिती सदस्यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार केला.