वाहन चोरीवर आळा घालण्यासाठी एचएसआरपी प्लेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2019 22:17 IST2019-03-31T22:17:17+5:302019-03-31T22:17:48+5:30
वाहनांचे नंबर प्लेट बदलवून दुसरेच क्रमांक लावून चोरीची वाहने सर्रास शहरात चालविले जातात. या वाहन चोरीवर आळा घालण्यासाठी आता देशभरातील वाहनांना एचएसआरपी प्लेट (नोंदणी क्रमांकाची सुरक्षीत प्लेट) १ एप्रिलपासून सर्वच नवीन वाहनांना लावण्यात येणार आहे.

वाहन चोरीवर आळा घालण्यासाठी एचएसआरपी प्लेट
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : वाहनांचे नंबर प्लेट बदलवून दुसरेच क्रमांक लावून चोरीची वाहने सर्रास शहरात चालविले जातात. या वाहन चोरीवर आळा घालण्यासाठी आता देशभरातील वाहनांना एचएसआरपी प्लेट (नोंदणी क्रमांकाची सुरक्षीत प्लेट) १ एप्रिलपासून सर्वच नवीन वाहनांना लावण्यात येणार आहे.
त्यामुळे चोरी गेलेल्या वाहनांची प्लेट बदलविण्याच्या नादात ती प्लेट तुटेल त्यामुळे दुसरी प्लेट बनविता येणार नाही. परिणामी चोरीला गेलेले वाहन सहजरित्या मिळविता येईल. रस्ते वाहतूक महामार्ग मंत्रालयाने ४ ते ६ डिसेंबर २०१८ दरम्यान जाहीर केलेल्या अधिसूचनेनुसार १ एप्रिल २०१९ पासून नविन उत्पादीत वाहनांना वाहन उत्पादक/ वाहनांचे वितरकामार्फत एचएसआरपी प्लेट बसविण्यात येणार आहे.
जुन्या वाहनांना वितरक किंवा एचएसआरपीचे उत्पादक एचएसआरपी प्लेट बसवू शकतील. त्यामुळे आता नविन वाहनांना एचएसआरपी प्लेट बसविले जाणार आहेत.
प्लेट लावणे ही वितरकाची जबाबदारी
उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने दिलेला क्रमांक एचएसआरपी प्लेटवर टाकून ती प्लेट वाहनावर लावून देण्याची जबाबदारी वाहन वितरकाची राहणार आहे. त्यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत.