शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

धानाची उचल केल्यानंतरच कळेल धान किती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 02, 2019 11:51 PM

सालेकसा तालुक्यातील सहकारी संस्थेच्या गोदामात प्रत्यक्षात खरेदी केलेल्या धानापेक्षा कमी धान असल्याच्या तक्रारीनंतर गठीत केलेल्या चौकशी समितीने चौकशीला सुरूवात केली आहे. या समितीने गुरूवारी (दि.२) सालेकसा येथे भेट देवून गोदामांची पाहणी केली.

ठळक मुद्देमोका चौकशीला सुरूवात : महासंचालकांना देणार अहवाल

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : सालेकसा तालुक्यातील सहकारी संस्थेच्या गोदामात प्रत्यक्षात खरेदी केलेल्या धानापेक्षा कमी धान असल्याच्या तक्रारीनंतर गठीत केलेल्या चौकशी समितीने चौकशीला सुरूवात केली आहे. या समितीने गुरूवारी (दि.२) सालेकसा येथे भेट देवून गोदामांची पाहणी केली. मात्र संस्थेच्या गोदामात धान किती आहे हे धानाची गोदामातून उचल केल्यानंतरच कळेल.त्यामुळे किती धान कमी आहे अथवा बरोबर हे आताच सांगता येणार नसल्याचे चौकशी समितीने सांगितले.जिल्ह्यात जिल्हा मार्केटिंग फेडरेशन व आदिवासी विकास महामंडळातंर्गत शासकीय धान केंद्र उघडून धान खरेदी केली जाते.यासाठी जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने जिल्ह्यात ठिकठिकाणी खरेदी केंद्र उघडण्यासाठी सहकारी संस्थाशी करार केला आहे. या संस्था करारनुसार धान खरेदी करुन धानाची उचल होईपर्यंत संस्थेच्या गोदामात ठेवतात.जिल्हा मार्केटिंग फेडरेशन टप्प्या टप्याने धानाची राईस मिल मालकांशी करार करुन भरडाईसाठी उचल करते. मात्र तोपर्यंत धान सहकारी संस्थेच्या गोदामात अथवा केंद्रावरच राहतो.मात्र यंदा सालेकसा तालुक्यात १ लाख ४० हजार ५८३ क्विंटल धान खरेदीे करण्यात आली.यापैकी ७९ हजार क्विंटल धानाची भरडाईसाठी उचल करण्यात आली. त्यामुळे सहकारी संस्थेच्या गोदामात ६१ हजार क्विंटल धान शिल्लक असणे आवश्यक आहे. मात्र जिल्हाधिकाऱ्यांना केलेल्या तक्रारीत संस्थेच्या गोदामात प्रत्यक्षात ५० हजार क्विंटल धान कमी असल्याचा आरोप केला. त्यानंतर जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले.चौकशी पूर्ण होईपर्यंत १० गोदामांना सील ठोकण्याचे आदेश दिले. तसेच मार्केटिंग फेडरेशनने याची चौकशी करण्यासाठी दोन सदस्यी चौकशी समिती गठीत केली.या समितीत मार्केटिंग फेडरेशनचे मुंबई येथील महाव्यवस्थापक कोक आणि भंडाराचे जिल्हा मार्केटिंग अधिकारी खर्चे या समितीने सोमवारपासून (दि.२९) चौकशीला सुरूवात केली. या समितीने जिल्ह्यात आतापर्यंत खरेदी करण्यात आलेला, यापैकी भरडाईसाठी किती धानाची उचल करण्यात आली व गोदामात किती धान शिल्लक आहे याची माहिती घेतली. त्यानंतर गुरूवारी (दि.२) सालेकसा येथे पोहचून गोदामांची पाहणी करुन संस्थेच्या अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.ही चौकशी पुन्हा आठ ते दहा दिवस चालणार असल्याची माहिती आहे. तर जेव्हापर्यंत गोदामांमधील पूर्ण धानाची उचल होत नाही तोपर्यंत गोदामात नेमके किती धान शिल्लक हे सांगता येणार नसल्याचे चौकशी समितीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.अहवालानंतरच कारवाई होणारसालेकसा येथील सहकारी संस्थेच्या गोदामात खरेदी केलेल्या धानापैकी किती धान शिल्लक आहे. याची चौकशी सध्या सुरू आहे. चौकशी समितीची धानाची उचल झाल्यानंतर याचा संपूर्ण अहवाल मार्केटिंग फेडरेशनचे महासंचालक यांच्याकडे सोपविणार नाही.त्यानंतर अहवालानंतर पुढील कारवाहीचा निर्णय घेण्यात येणार आहे.आरोपाचे तथ्य उलगडणारसहकारी संस्थेच्या गोदामात प्रत्यक्षात खरेदी केलेल्या धानापेक्षा ५० हजार क्विंटल धान कमी असल्याची तक्रार काही जणानी जिल्हाधिकाºयांकडे केली. त्यानंतर या प्रकणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे. मात्र सहकारी संस्थानी संस्थेवर केलेले आरोप तथ्यहीन असल्याचे म्हटले आहे. मात्र याचा उलगडा हा चौकशी समितीच्या अहवालानंतरच होणार आहे.तर फौजदारी कारवाईसहकारी संस्थेच्या गोदामात जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या रेकार्डनुसार प्रत्यक्षात कमी धान आढळल्यास संबंधितावर फौजदारी कारवाई केली जाणार असल्याची माहिती या विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले.आदिवासी विकास महामंडळाच्या धान खरेदी चौकशी कराजिल्हा मार्केटिंग फेडरेशनप्रमाणेच आदिवासी विकास महामंडळातंर्गत सुध्दा धान खरेदी केली जाते. मात्र त्यांचा धान गोदामात नसून ठिकठिकाणी उघड्यावर ठेवण्यात आला आहे. त्यामुळे आदिवासी विकास महामंडळाने खरेदी केलेल्या धानाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी सुध्दा आता केली जात आहे.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्ड