चालकच नसल्याने बसेस धावणार तरी कशा ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2022 05:00 IST2022-01-01T05:00:00+5:302022-01-01T05:00:03+5:30
‘ शासन मागण्या मान्य करेना व कर्मचारी मागे हटेना ’ अशा पेचात संप सुरूच आहे. जिल्ह्यातील स्थिती बघितल्यास गोंदिया व तिरोडा आगारातील कर्मचारीही संपावर गेले आहेत. यामुळे दोन्ही आगारातील एकही बस रस्त्यावर उतरलेली नाही. गोंदिया व तिरोडा या दोन्ही आगारात एकही चालक कामावर नसल्याने बस चालविणाराच कुणी नसून बसेस आगारातच उभ्या आहेत.

चालकच नसल्याने बसेस धावणार तरी कशा ?
कपिल केकत
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : राज्यात २७ ऑक्टोबरपासून सुरू असलेल्या राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या संपाला आता २ महिने पूर्ण झाले आहेत. जोपर्यंत महामंडळाचे शासनात विलीनीकरण नाही तोपर्यंत संप सुरूच राहणार असा कर्मचाऱ्यांचा पवित्रा असून ते निर्णयावर ठाम आहेत. यामुळे अवघ्या राज्यात एसटी आगारात उभी असून संप सुटण्याची वाट बघितली जात आहे. मात्र ‘ शासन मागण्या मान्य करेना व कर्मचारी मागे हटेना ’ अशा पेचात संप सुरूच आहे. मात्र शासनाच्या कारवाईच्या इशाऱ्यानंतर काही कर्मचारी कामावर परतत असल्याने काही जिल्ह्यांतील फेऱ्या सुरू झाल्या आहेत.
जिल्ह्यातील स्थिती बघितल्यास गोंदिया व तिरोडा आगारातील कर्मचारीही संपावर गेले आहेत. यामुळे दोन्ही आगारातील एकही बस रस्त्यावर उतरलेली नाही. गोंदिया व तिरोडा या दोन्ही आगारात एकही चालक कामावर नसल्याने बस चालविणाराच कुणी नसून बसेस आगारातच उभ्या आहेत.
संप सुरू झाल्यापासून दोन्ही आगारातून एकही भस रस्त्यावर आलेली नाही.
दोन्ही आगारात चालक कामावर नसल्याने बसेस धावणार तरी कशा ? असा प्रश्न येथे पडतो.
गोंदिया- भंडारा मार्गावर बसेस सुरू
- जिल्ह्यातील गोंदिया व तिरोडा आगारातील एकही चालक कामावर नसल्याने सर्वच बसेस बंद आहेत. यामुळे भंडारा आगारातून बसेस येथे पाठविल्या जात आहेत. भंडारा येथील बसेस तिरोडा मार्गाने प्रवासी नेत असल्याची माहिती आहे. मात्र गोंदिया व तिरोडा आगारातील एकही बस फेरी मारत नाही.
सर्वच बसेस आगारात उभ्या
- चालक नसल्याने बसेस चालविणारा कुणीही नसून बसेस उभ्या आहेत. अशात भंडारा आगारातील बस तिरोडा होत गोंदिया फेरी मारत आहे. मात्र जिल्ह्यातील अन्य सर्वच मार्गांवरील फेऱ्या बंद आहेत. चालक जोपर्यंत कामावर येत नाही तोपर्यंत अन्य मार्गावरील फेऱ्या सुरू होणार नाही.
चालक नसल्याने बस चालविणार कोण?
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला आता २ महिने पूर्ण झाले आहेत. एसटी नसल्यामुळे आम्हाला अन्य वाहनांनी प्रवास करावा लागत आहे. मात्र ते परवडणारे व सुरक्षित नाही. अशात आता एसटीचा संप मागे झाला पाहिजे व एसटी परत सुरू झाली पाहिजे.
-प्रल्हाद महंत
सुरक्षित प्रवासासाठी एसटीवर सर्वांचा विश्वास आहे. मात्र २ महिन्यांपासून एसटी कर्मचारी संपावर गेल्याने बसेस बंद असून प्रवाशांची अडचण होत आहे. पर्याय नसल्याने आम्हाला अन्य वाहनांनी प्रवास करावा लागत आहे. आता एसटी सुरू होण्याची गरज आहे.
- मुकेश गणवीर
चालक कामावर नाहीत
आगारातील एकही चालक कामावर परतून आले नसून ते संपात सहभागी आहेत. अशात बस चालविणारेच नसल्याने बसेस आगारात उभ्या आहेत. सध्या एकही फेरी सुरू झालेली नाही. -संजना पटले,आगारप्रमुख, गोंदिया