तोकड्या यंत्रनेने प्रशासन कसे चालणार?

By Admin | Updated: August 12, 2015 02:12 IST2015-08-12T02:12:55+5:302015-08-12T02:12:55+5:30

आदिवासी व नक्षलग्रस्त असलेल्या गोंदिया जिल्ह्यात मनुष्यबळाची अत्यंत कमरतता आहे. या यंत्रनेमुळे डॉक्टरांना

How to administer the handling mechanism? | तोकड्या यंत्रनेने प्रशासन कसे चालणार?

तोकड्या यंत्रनेने प्रशासन कसे चालणार?

३७० पदे रिक्त : निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांचा प्रभार अनुप्रिया झा यांच्याकडे
गोंदिया : आदिवासी व नक्षलग्रस्त असलेल्या गोंदिया जिल्ह्यात मनुष्यबळाची अत्यंत कमरतता आहे. या यंत्रनेमुळे डॉक्टरांना कधी १२ तास तर कधी १८ तास काम करावे लागते. कधी कधी २४ तास काम करूनही सुट्टी घेता येत नाही अश्या परिस्थितीमुळे आरोग्य विभागाचेही स्वास्थ बिघडत आहे. रिक्त पदांमुळे आरोग्य यंत्रणाच आजारी पडत आहे.
केटीएस येथे उपचारासाठी आलेल्या रूग्णांच्या नोतेईकांना त्वरीत उपचार व्हावा, डॉक्टरांनी फक्त माझ्याच रूग्णाला जास्त वेळ द्यावी अशी प्रत्येकाची धारणा राहात असल्यामुळे येथे येणारे रूग्णांचे नातेवाईकही अनेकवेळा कारण नसताना डॉक्टरांशी हुज्जत घालतात. व त्याच्या शब्दाला डॉक्टराने उत्तर दिले तर त्यांच्या शब्दाना घेऊन ऊहापोह केला जातो. परिणामी मोठे प्रकरणे या रूग्णालयात घडतात.
रूग्णालयात मोठ्या प्रमाणात डॉक्टरांची कमतरता असल्यामुळे रूग्णालयात २४ तास सेवा द्यायची कशी असा प्रश्न जिल्हा शल्यचिकीत्सकांसमोर पडला आहे. तरी देखील तोकड्या यंत्रणेतून रूग्णांना चांगली आरोग्य सेवा देण्याचा प्रयत्न सुरू आहे. जिल्हा शल्य चिकीत्सक यांच्या अधिनस्त येणाऱ्या केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालय, बाई गंगाबाई स्त्री रूग्णालय, उपजिल्हा रूग्णालय व सर्व ग्रामीण रूग्णालयातील मंजूर पदांपैकी ३७० पदे रिक्त आहेत. अनुभवी डॉक्टर येथे येत नाही. किंवा शासनही पाठवत नाही. वर्ग एकची ३५ पदे मंजूर असताना त्यापैकी फक्त १० पदे भरलेली आहेत. उर्वरीत २५ पदे रिक्त आहेत. वर्ग दोनची ८७ पदे मंजूर असताना त्यापैकी फक्त ७३ पदे भरलेली आहेत. उर्वरीत १४ पदे रिक्त आहेत.
वर्ग तीनची ५०६ पदे मंजूर असताना त्यापैकी फक्त ३३० पदे भरलेली आहेत. उर्वरीत १७६ पदे रिक्त आहेत.वर्ग चारची २८३ पदे मंजूर असताना त्यापैकी फक्त १२८ पदे भरलेली आहेत. उर्वरीत १५५ पदे रिक्त आहेत. जिल्हा सामान्य रूग्णांलयांतर्गत येणाऱ्या आरोगञय संस्थेत एकूण ९११ पदे मंजूर असताना ५४१ जागा भरल्या आहेत. यातील ३७० पदे रिक्त आहेत.
सदर पदे आधीच मंजूर केलेली आहेत. मात्र आता लोकसंख्या वाढत असतानाही कर्मचारी, अधिकारी यांच्या संख्येत वाढ होणे अपेक्षित आहे. परंतु जूनेच मंजूर पदे भरण्यात आले नाही. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर विपरीत परिणाम होत आहे. (तालुका प्रतिनिधी)

अखेर परियाल यांच्याकडून काढले आरएमओचे पद
४दोन दिवसापूर्वी घडलेल्या घटनेत डॉ. अनिल परियाल यांचा दोष असल्याचा आरोप केल्यामुळे जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. रवि धकाते यांनी डॉ. अनिल परियाल यांची चौकशी करण्याचे आदेश दिले. तसेच त्यांच्याकडे असलेले निवासी वैद्यकीय अधिकाऱ्याचा प्रभार काढून डॉ. अनुप्रिया झा यांच्याकडे देण्यात आला आहे.

रूग्णांची संख्या वाढती मात्र डॉक्टर तुटपुंजे यावर प्रत्येक डॉक्टरवर कामाचा ताण आहे. तरी देखील प्रामाणिकपणे आरोग्य सेवेकडे आमचे डॉकञटर लक्ष घालतात.
-डॉ. रवी धकाते
जिल्हा शल्य चिकित्सक गोंदिया.

Web Title: How to administer the handling mechanism?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.