अतिवृष्टीने राजगुडा, मंदीटोला येथील घरांची पडझड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:35 IST2021-09-16T04:35:42+5:302021-09-16T04:35:42+5:30

सडक अर्जुनी : जिल्ह्यात मागील तीन ते चार दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे. सडक अर्जुनी तालुक्यात मंगळवारी मुसळधार पाऊस ...

Houses in Rajguda, Manditola collapsed due to heavy rains | अतिवृष्टीने राजगुडा, मंदीटोला येथील घरांची पडझड

अतिवृष्टीने राजगुडा, मंदीटोला येथील घरांची पडझड

सडक अर्जुनी : जिल्ह्यात मागील तीन ते चार दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे. सडक अर्जुनी तालुक्यात मंगळवारी मुसळधार पाऊस झाल्याने राजगुडा, मंदीटोला, माेगरा येथील घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली, तर काही नागरिकांच्या घरांमध्ये पाणी साल्याने त्यांची गैरसोय झाली.

हवामान विभागाने जिल्ह्यात शुक्रवारपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यातच मागील तीन ते चार दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे. यामुळे नदी, नाले भरून वाहात असून, संकटातील पिकांना दिलासा मिळाला आहे. मात्र, संततधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात घरांची पडझड झाली आहे. तालुक्यातील राजगुडा, मंदीटोला, मोगरा येथील घरांची पडझड झाली. तर काही नागरिकांच्या घरात गुडघाभर पाणी साचले आहे. राजगुडा येथील भोजराज इडपाते यांच्या घरात पाणी साचले तसेच घराची भिंत कोसळल्याने त्यांचे ७० ते ८० हजार रुपयांचे नुकसान झाले, तर नागेश वैद्य यांच्या वाडीतील तूर पीक वाहून गेले. अजित मेश्राम यांच्या घरात पाणी साचल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पावसामुळे नुकसान झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण तलाठी राजू उपरीकर यांनी केले. नुकसान झालेल्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी सरपंच मोहन सुरुसाऊत, उपसरपंच भय्यालाल मडावी, नीलकंठ परतेकी, मंगेश पंचभाई, नागेश वैद्य, किस्मत पंचभाई, आतील वैद्य यांनी केली आहे.

Web Title: Houses in Rajguda, Manditola collapsed due to heavy rains