नंगपुऱ्यातील घर जळाले
By Admin | Updated: May 20, 2015 01:29 IST2015-05-20T01:29:14+5:302015-05-20T01:29:14+5:30
जवळील नंगपुरा येथील शेतकऱ्याचे घर दि. १८ मे रोजी ११ वाजता जळून १ लाख ५० हजाराचे नुकसान झाले.

नंगपुऱ्यातील घर जळाले
शेतीपयोगी साहित्य खाक : १ लाख ५० हजारांचे नुकसान
कालीमाटी : जवळील नंगपुरा येथील शेतकऱ्याचे घर दि. १८ मे रोजी ११ वाजता जळून १ लाख ५० हजाराचे नुकसान झाले.
आमगाव तालुक्यातील नंगपुरा येथील रामाजी पोतन मोटघरे, ग्यानिराम मोटघरे यांच्या घरातील शेतीचे साहित्य गुरांचा चारा, वाटर पंप, बैलबंडी व इतर साहित्य जळून खाक झाले.
सदर आगीमुळे शेतकऱ्यांचे १ लाख ५० हजारचे नुकसान झाले. आगीवर नियंत्रणासाठी गोंदिया येथील अग्नीशमन दलाची गाडी पाचारण करण्यात आली होती, तरीही मोठ्या प्रमाणात हाणी झाली. (वार्ताहर)