हॉटेलबंदीने महिलांची भाजी-भाकरी थांबली !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:30 IST2021-04-07T04:30:15+5:302021-04-07T04:30:15+5:30

........ वर्ष कसे काढले आमचे आम्हाला ठाऊक १) मागच्या वर्षीच्या लॉकडाऊनने दोन महिने हाताला काम नव्हते. त्यातच आधी कमावलेले ...

Hotel ban stops women's vegetables and bread! | हॉटेलबंदीने महिलांची भाजी-भाकरी थांबली !

हॉटेलबंदीने महिलांची भाजी-भाकरी थांबली !

........

वर्ष कसे काढले आमचे आम्हाला ठाऊक

१) मागच्या वर्षीच्या लॉकडाऊनने दोन महिने हाताला काम नव्हते. त्यातच आधी कमावलेले पैसे संपूर्ण संपले. कोरोनाच्या धास्तीमुळे इतर सर्व खर्च बंद करून फक्त पोटाची आग विझविण्याकडेच लक्ष ठेवले होते.

२) लॉकडाऊनच्या काळात पोट भरणे कठीण झाले होते. त्यामुळे उसनवारीवर सामान आणून जीवन जगण्याचा खटाटोप केला. परंतु कोरोनाने लॉकडाऊन केला जातो. परंतु आमच्यासारख्या गोरगरिबांचा खाण्याचा प्रश्न तसाच ठेवून शासन आपला मनमर्जी कारभार करतो.

३) कोरोनाने मरण्याच्या भीतीने आता उपाशी मरण्याची वेळ आली आहे. आमच्या हाताला कामच नाही तर पोट भरायचे कसे. दुसऱ्यांचे पोट भरणाऱ्या हॉटेलमधून आपलेही पोट भरत होते. परंतु कोरोनामुळे हॉटेल बंद झाल्याने हाताला कामच नाही. मागचे वर्ष कठीण समस्येने काढले.

...............

आता तुम्हीच सांगा जगायचे कसे?

जिल्ह्यात हॉटेलांची संख्या -४००

पोळी भाजी करणाऱ्या महिलांची संख्या -१०००

....................

कोट

मागच्या वर्षीपासून कोरोनाने आमचा रोजगार बुडविला. खर्च वाढतच आहे. परंतु हाताला काम नसल्यामुळे आमच्या अंगी नैराश्य येत आहे. काय करावे हे सूचत नाही.

-मुन्नीबाई बागडे, पोळी भाजी करणारी महिला

....

हॉटेलमध्ये पाेळी भाजी करून आपला उदरनिर्वाह चालवायची. परंतु मागच्या वर्षीपासून कोरोनाचे नाव सांगून हाॅटेल बंदी केली जाते. त्यामुळे आमच्या हाताला काम नाही, दोन पैसे हातात येत होते ते बंद झाले. घर चालविणे कठीण झाले आहे.

- संगीता नागरीकर,पोळी भाजी करणारी महिला

.....

कोरोनाचा संसर्ग वाढला की, सगळ्यात आधी फटका हॉटेलांना दिला जातो. त्यामुळे आमची रोजी रोटी बंद होते. हॉटेल बंद करण्यापूर्वी शासनाने आमची सोय करायला पाहिजे. पण तसे न करता नुसती बंधनेच आमच्यावर लादतात.

- राधिका चचाने, पोळी भाजी करणारी महिला

Web Title: Hotel ban stops women's vegetables and bread!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.