शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
2
स्कुबा डायव्हिंग करताना ५२ वर्षीय प्रसिद्ध गायकाचा मृत्यू, चाहत्यांना मोठा धक्का
3
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
4
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
5
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
6
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
7
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
8
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
9
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
10
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
11
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
12
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
13
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
14
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
15
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
16
‘मोहरा’ मध्ये सुनिल शेट्टीसोबत रोमान्स करणारी ही अभिनेत्री आता दिसते अशी, ओळखणंही झालं कठीण
17
अनिल अंबानी यांना दणका; येस बँक कर्ज घोटाळा प्रकरणात CBI कडून चार्जशीट दाखल
18
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
19
"मोदी-फडणवीसांच्या आईवर बोलले गेले, तेव्हा शरद पवारांनी फोन केला नाही, मी माफी कशासाठी मागू"
20
सरकारी नोकरी मिळवण्याचा गोल्डन चान्स; इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये भरती

गोरेगावात थरकाप उडवणारा खून ! जादूटोण्याच्या संशयावरून शेतकऱ्याचा केला खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 13:11 IST

Gondia : लोखंडी कुऱ्हाडीने डोक्यावर घातला होता वार

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : गोरेगाव तालुक्यातील हेटीटोला येथील शेतकरी आसाराम देऊ कांबळे (५५) यांच्यावर आरोपी जादूटोण्याच्या संशय घेऊन त्यांचा निघृण खून करण्यात आला. ही घटना १७ जून रोजी दुपारी ३ ते संध्याकाळी ६:३० वाजता घडली. आसाराम कांबळे हे शेळ्या चारण्यासाठी गावालगतच्या जंगलात गेले होते. संध्याकाळी शेळ्या परत आल्याने कुटुंबीयांनी शोध घेतला असता जंगलातील तलावाजवळ त्यांचा मृतदेह सापडला. याप्रकरणात आरोपी देवेंद्र उर्फ भुरू चुन्नीलाल ताराम (२४) रा. हेटी, (सध्या मूळगाव हैद्राबाद) याला अटक करण्यात आली. पोलिस अधीक्षक गोरख भामरे यांच्या सूचनेवरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पुरुषोत्तम अहेरकर यांच्या मार्गदर्शनात अवघ्या काही तासांत आरोपी देवेंद्र उर्फ भुरू चुन्नीलाल ताराम याला हलबीटोला येथून अटक करण्यात आली.

गोरेगाव पोलिसांनी आरोपीवर भारतीय न्याय संहिता कलम १०३ (१) अन्वये गुन्हा नोंद केला होता. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या सहायक पोलिस निरीक्षक धीरज राजुरकर, पोलिस उपनिरीक्षक शरद सैंदाणे, पोलिस हवालदार राजेंद्र मिश्रा, महेश मेहर, विठ्ठल ठाकरे, दीक्षितकुमार दमाहे, प्रकाश गायधने, इंद्रजित व सुबोध बिसेन, हंसराज भांडारकर, छगन विठ्ठले, राकेश इंदुरकर, सुनील डहाके, योगेश रहिले, लक्ष्मण बंजार, घनश्याम कुंभलवार, राम खंडारे यांनी केली आहे. 

खून करण्यासाठी तो आला हैदराबादवरूनमृतकाने जादूटोना केल्याच्या संशयावरून आसाराम यांचा खून करण्यासाठी आरोपी देवेंद्र उर्फ भुरू हा हैद्राबादवरून मुद्दाम गावी आला. यानंतर त्यांने जंगलात आसारामच्या डोक्याच्या मागे लोखंडी कुऱ्हाडीने वार करून त्याचा खून केला. घटनेनंतर तो परत हैद्राबादला जात असताना पोलिसांनी त्याला अटक केली.

तपासासाठी तीन चमू केल्या होत्या गठितपोलिस अधीक्षक गोरख भामरे यांच्या सूचनेप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पुरुषोत्तम अहेरकर यांच्या मार्गदर्शनात गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेऊन त्याला जेरबंद करण्याकरिता स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस अधिकारी, अंमलदार यांची ३ पथके नेमण्यात आली होती. पथकाने गुप्त माहितीच्या आधारावर आरोपीची माहिती घेत त्याच्या नातेवाईकाचे घर गाठले. तिथे आरोपी आढळला. सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसी खाक्या दाखविताच त्यांने खून केल्याची कबुली दिली.

टॅग्स :gondiya-acगोंदियाCrime Newsगुन्हेगारी