सिमेंट नाला बंधाऱ्याचे जलपूजन

By Admin | Updated: August 26, 2015 01:44 IST2015-08-26T01:44:56+5:302015-08-26T01:44:56+5:30

जवळ असलेल्या चांदोरी (बु.) येथे कृषी मंडळ मुंडीकोटाच्या वतीने चांदोरी या नाल्यावर सिमेंटचा पक्का बंधार तयार करण्यात आला.

Hormonate of Cement Nala Bandh | सिमेंट नाला बंधाऱ्याचे जलपूजन

सिमेंट नाला बंधाऱ्याचे जलपूजन

मुंडीकोटा : जवळ असलेल्या चांदोरी (बु.) येथे कृषी मंडळ मुंडीकोटाच्या वतीने चांदोरी या नाल्यावर सिमेंटचा पक्का बंधार तयार करण्यात आला. या बंधाऱ्यामुळे अनेक शेतकऱ्यांना शेतीच्या कामासाठी लाभ मिळणार आहे.
या सिमेंट नाल बंधाऱ्याचे जलपूजन शनिवारी करण्यात आले. बंधाऱ्यामुळे उन्हाळ्यात जनावरांच्या पाण्यासाठी सोय होईल. हा बंधारा महिलांना कपडे धुण्याकरिता सोयीचा झाला आहे.
या वेळी जि.प. सदस्य मनोज डोंगरे, सरपंच जयसिंग उपासे, रामलाल बाबरे, राजकुमार कडव, सेवकराम ठाकरे, कैलास येवले, गणेश बाबरे, मनोहर निनावे, अधिकारी किंदरले, कृषी पर्यवेक्षक कूकडे, कृषि सहायक बेहलपांडे व नमीता यादव व शेतकरी यावेळी उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Hormonate of Cement Nala Bandh