होम क्वारंटाईन रुग्णांनी गावात फिरणे धोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:25 IST2021-04-26T04:25:58+5:302021-04-26T04:25:58+5:30
केशोरी : अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील केशोरी कनेरी या गावातील कोरोनाचा झालेला विस्फोट लक्षात घेवून तालुका प्रशासनाने आवागमन करण्यासाठी प्रतिबंधीत क्षेत्र ...

होम क्वारंटाईन रुग्णांनी गावात फिरणे धोकादायक
केशोरी : अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील केशोरी कनेरी या गावातील कोरोनाचा झालेला विस्फोट लक्षात घेवून तालुका प्रशासनाने आवागमन करण्यासाठी प्रतिबंधीत क्षेत्र घोषीत करुन संचारबंदी लागू केली आहे. तरीही दररोज वाढणारी कोरोना रुग्ण संख्या थांबत नसल्याचे चित्र आहे. रुग्णांवर उपचार करता-करता आरोग्य विभाग हतबल झाले आहे. कोरोना रुग्ण वाढीला कारणीभूत असणारे होम क्वारंटाईन व्यक्ती कुणालाही न जुमानता दिवसातून पाच ते सहा वेळा घराबाहेर पडत असल्यामुळे कोरोना संसर्ग वाढत असल्याचे बोलल्या जात आहे.
वास्तविक होम क्वारंटाईन कोरोना बाधित रुग्णांनी १४ ते १७ दिवसापर्यंत सामान्य लोकांच्या संपर्कात येवू नये असे असतानाही होम क्वारंटाईन रुग्ण गावात फिरत असल्यामुळे अधिक धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोना बाधीत रुग्ण साधारणत: १४ ते १७ दिवसापर्यंत सामान्य निरोगी व्यक्तीस कोरोनाचा संसर्ग पसरवू शकतो.या बाबीकडे कोरोना बाधीत रुग्ण दुर्लक्ष करुन मला काहीच लक्षणे दिसत नाही. मला काहीच त्रास नाही, मी बरा आहे, नार्मल झालो आहे. असे सांगून पाच ते सहा वेळा दिवसातून घराबाहेर पडून कोरोनाचा संसर्ग वाढवित आहे. अशा व्यक्तींनी घरी राहूनच प्रशासनाला, आरोग्य विभागाला मदत केली पाहिजे. परिणामी कोरोनाच्या संसर्गावर आळा घालण्यासाठी मदत करणे गरजेचे आहे. कोरोना महामारीला कोणीही हलक्यात घेवू नये.
.......
सुजान नागरिक म्हणून सहकार्य करा
प्रशासन व आरोग्य विभाग त्यांच्या परीने पूर्ण ताकदीने रात्रदिवस काम करीत आहेत आपण उघड्या डोळ्यानी परिस्थिती पाहात आहोत. तरीही विनाकारण फिरण्याकडे अधिक लक्ष कृपया असे न करता होम क्वारंटाईन कोरोना बाधीत रुग्णांनी घरात राहून आपली व आपल्या परिवाराची काळजी घेणे गरजेचे आहे. आपण सुजाण नागरिक म्हणून प्रशासनाच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे दिवसेंदिवस कोरोनाचा वाढणारा संसर्ग थांबविण्यासाठी मदत करणे आवश्यक झाले आहे. कोरोना बाधीत रुग्ण गावात विनाकारण फिरुन समाजासाठी आणि आपल्या कुटूंबासाठी देखील घातक ठरु पाहात आहेत. होम क्वारंटाईन व्यक्तीने सामाजिक जबाबदारी समजून बाहेर फिरणे टाळावे आपला होम क्वारंटाईन कालावधी घरात राहून पूर्ण करावा असे आवाहन गावातील सामाजिक व राजकीय कार्यकर्त्यानी केले आहे.