बोथलीत घराची ‘होळी’

By Admin | Updated: March 15, 2017 00:52 IST2017-03-15T00:52:57+5:302017-03-15T00:52:57+5:30

तालुक्यातील बोथली या गावी होळीच्या रात्री ९.३० वाजता छाया दसरथ मेश्राम (४०) या विधवा महिलेच्या घराला

'Holi' of 'House' | बोथलीत घराची ‘होळी’

बोथलीत घराची ‘होळी’

सडक-अर्जुनी : तालुक्यातील बोथली या गावी होळीच्या रात्री ९.३० वाजता छाया दसरथ मेश्राम (४०) या विधवा महिलेच्या घराला अचानक आग लागून तिच्या घराची होळी झाली. यात ४८ हजार रुपयांचे नुकसान झाले.
होळीच्या रात्रीला छाया शेजारच्या घरी होळीची पूजा आटपून टीव्ही पाहण्याकरीता गेली होती. दोन मुली व एक मुलगा सुध्दा खेळण्याकरीता बाहेर गेले होते. एक तासानंतर शेजाऱ्याला छायाच्या घरातून आगीचा धूर निघताना दिसला. आरडाओरड झाल्यानंतर आग विझविण्यात आली, मात्र तोपर्यंत घरातील कपडे, लाकडी आलमारी, सोन्याची अंगठी, कानातील डोरले, तांदूळ, मुलांचे कपडे, भांडे व महत्वाचे कागदपत्र जळून खाक झाले. सकाळी गावकरी व तलाठी यांनी पंचनामा केला. अंदाजे ४८ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे कळले. मदत करण्याची मागणी तहसीलदार यांच्याकडे केली आहे. (तालुका प्रतिनिधी

Web Title: 'Holi' of 'House'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.