शहरात सुरू झाली होर्डिंग्स हटाओ मोहीम
By Admin | Updated: May 24, 2014 23:40 IST2014-05-24T23:40:43+5:302014-05-24T23:40:43+5:30
लोकसभा निवडणुकीचे निकाल लागताच शहरात नवनिर्वाचित खासदारांना शुभेच्छा देणार्या होर्डींग्सने शहर पुन्हा एकदा होर्डींग्समय झाले होते. बघावे तेथे होर्डींग्स दिसून येत होते. यावर मात्र पुन्हा

शहरात सुरू झाली होर्डिंग्स हटाओ मोहीम
होर्डिंग्स काढण्याचे दिले निर्देश : पदवीधर निवडणुकीची आचारसंहिता लागू गोंदिया : लोकसभा निवडणुकीचे निकाल लागताच शहरात नवनिर्वाचित खासदारांना शुभेच्छा देणार्या होर्डींग्सने शहर पुन्हा एकदा होर्डींग्समय झाले होते. बघावे तेथे होर्डींग्स दिसून येत होते. यावर मात्र पुन्हा लगाम लागली आहे. पदवीधर मतदार संघाच्या निवडणुका जाहीर झाल्या असून आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे जिल्हा निवडणूक विभागाने होर्डींग्स काढण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार शनिवारी (दि.२४) शहरात होर्डींग्स हटाओ मोहीम सुरू झाल्याचे दिसून आले. लोकसभा निवडणुकीचे निकाल १६ मे रोजी जाहीर झाले. भारतीय जनता पक्षाचे नाना पटोले निवडणुकीत विजयी झाल्याने शहरात त्यांच्या चाहत्यांनी तसेच भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अवघ्या जिल्हाभरात होर्डींग्स लाऊन आपल्या शुभेच्छा व्यक्त केल्या. शहरात तर काही जास्तच प्रमाणात नानांचा चाहता वर्ग दिसून आला. बघावे तेथे होर्डींग्स दिसून येऊ लागले. यातून रस्त्यांचे दुभाजक सुद्धा सुटले नाही. काहींनी नगर परिषदेकडे कर भरून होर्डींग्स लावले तर बहुतांश चाहत्यांनी नियम तोडून आपल्या शुभेच्छा व्यक्त केल्या. होर्डींंग्सच्या या युद्धात शहराचे सौंदर्यीकरण मात्र पुन्हा बकाल झाले होते. असे असतानाच मात्र पदवीधर मतदार संघाच्या निवडणुका जाहीर झाल्या असून आचारसंहिता लागू झाली. यावर जिल्हा निवडणूक विभागाने शुक्रवारी (दि.२३) राजकीय पक्षांची बैठक घेऊन त्यांना निवडणूक कार्यक्रम आचारसंहितेला घेऊन आवश्यक ती माहिती दिली. एवढेच नव्हे तर उपविभागीय अधिकारी, तहसिलदार व नगर परिषद मुख्याधिकारी यांना शहरातील होर्डींग्स काढण्यासाठी आवश्यक ते निर्देश दिलेत. यावर नगर परिषद कामाला लागली असून शहरात होर्डींंग्स लावणार्या कित्येकांनी आपापले होर्डींंग्स काढण्यास सुरूवात केल्याचे शनिवारी (दि.२४) दिसून आले. त्यामुळे होर्डींंग्स लाऊन नानांना आपले प्रेम व्यक्त करणार्यांना होर्डींंग्स काढावे लागत आहे. एकंदर आचारसंहितेमुळे शहरात पुन्हा एकदा होर्डींंग्स हटाओ मोहिम सुरू झाल्याचे दिसून येत आहे. (शहर प्रतिनिधी)