शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

३१ मे रोजी सर्वाधिक तापमानाची नोंद

By admin | Updated: June 4, 2014 23:50 IST

विदर्भात उष्णतेच्या लाटेने जनजीवन प्रभावीत झाले असताना यावर्षी गोंदियात सुद्धा पारा जास्तच वर चढत आहे. यावर्षी शनिवारी ३१ मे रोजी तापमान तब्बल ४५.१ अंश सेल्सिअस असल्याची नोंद सरकारी यंत्रणेने घेतली.

गोंदिया : विदर्भात उष्णतेच्या लाटेने जनजीवन प्रभावीत झाले असताना यावर्षी गोंदियात सुद्धा पारा जास्तच वर चढत आहे. यावर्षी शनिवारी ३१ मे रोजी  तापमान तब्बल ४५.१ अंश सेल्सिअस असल्याची नोंद सरकारी यंत्रणेने घेतली. या तापमानामुळे घराबाहेर पडणे कठीण झाल्याने शहरासह ग्रामीण भागात अघोषित संचारबंदी असल्यासारखे चित्र निर्माण होत आहे.उन्हाळ्य़ाच्या सुरूवातीला पाऊस व गारपीटीने काही दिवस गारवा निर्माण झाला होता. त्यामुळे उन्हाळ्य़ाच्या खर्‍या चटक्यांची चव लागायची होती. त्यानंतर मात्र एप्रिलच्या सुरूवातीच्या पंधरवड्यानंतर उन्हाळा आपल्या रंगात आला. तर मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच सूर्याने आग ओकण्यास सुरुवात केली. यावर्षीचे सर्वाधिक तापमान ४५.१ अं.से. पेक्षा जास्त नोंदविण्यात आले. यामुळे उष्णतेच्या लाटेने जनजीवनावर तीव्र परिणाम झाला. दुपारी १२ वाजतानंतर घराबाहेर पडणे नागरिकांनी बंद केले आहे. शहरातील रस्ते व बाजारपेठ १२ ते ५ या वेळेत सामसूम असते. एकंदरीत शहरात अघोषित संचारबंदी असते. गेल्या आठ दिवसांपासून सतत गोंदियाचे तापमान ४३ अंशांपेक्षा जास्त राहत असल्यामुळे दुपारी १२ वाजतानंतर कोणीच घराबाहेर पडताना दिसत नाही.उष्णतेचा हा कहर सुरू असतानाच नवतपा चांगलाच तापला. नवतपाच ३१ मे रोजी सर्वाधीक ४५.१ अं.से.तापमानाची नोंद घेण्यात आली. उष्णतेच्या या लाटेने गोंदिया चांगलाच तापत असून अशात कुलर सुद्धा काम करीत नसल्याचे नागरिक बोलू लागले आहेत. उष्णतेचा कोप सुरू असतानाच त्यात वेळी अवेळी होत असलेले भारनियमन जखमेवर मिठाचे काम करीत आहे. उकाड्याने अंगाची लाही-लाही होत असल्याने नागरिक बाहेर निघणे टाळत आहेत. तर भारनियमनामुळे घरात जीव गुदमरू लागला असून नागरिकांसाठी इकडे-आड व तिडके विहीर अशी स्थिती निर्माण झाल्याचे चित्र आहे.  सुर्याच्या कोपामुळे कार्यालयीन कर्मचारी व  व्यावसायिक सुद्धा दुपारच्या वेळी घरी जाण्याचे टाळत आहेत. मजुरांना बाहेर पडणे अनिवार्य असल्याने तीव्र उष्णतेपासून बचाव करण्यासाठी स्कार्फ व उष्णतारोधक कापडांचा वापर करीत आहेत. वाढत्या उकाड्यात गारवा मिळण्यासाठी शहरातील विविध चौकात व सार्वजनिक ठिकाणी शीतपेयाची दुकाने लागली आहेत. तर कामानिमित्त घराबाहेर पडलेल्यांना गळा कोरडा पडल्यास पोणपोई सोयीची ठरत आहे.  शेतकरी बांधव सुद्धा उन्हाच्या चटक्यांपासून बचाव करण्यासाठी पहाटेलाच उठून शेतातील कामे ११ वाजतापूर्वी पूर्ण करीत आहेत. वाढत्या तापमानाचा फटका व्यावसायिकांना देखील बसला आहे. दुपारनंतर बाजारपेठ ग्राहकाविना ओस पडलेली असते. वाढत्या उन्हामुळे ग्रामीण व शहरी भागातील रस्ते पूर्णत सामसूम दिसत आहेत. (शहर प्रतिनिधी)